Advertisement

ॲम्ब्युलन्सवरील सायरनचा आवाज बदलणार, नितीन गडकरींची घोषणा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आता अॅम्ब्युलन्सच्या सायरन संदर्भात मोठी घोषणा केली.

ॲम्ब्युलन्सवरील सायरनचा आवाज बदलणार, नितीन गडकरींची घोषणा
SHARES

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आता अॅम्ब्युलन्सच्या सायरन संदर्भात मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, मी आदेश काढणार आहे की ॲम्ब्युलन्सवर जर्मन संगीतकारानं तयार केलेले संगीत वापरण्यात यावे. आताचा कर्कश सायरन ॲम्ब्युलन्सवर नको.

काही दिवसांपूर्वी गडकरी यांनी सध्या गाड्यांमध्ये जे हॉर्न आहेत, त्याजागी भारतीय वाद्यांच्या आवाजाचे हॉर्न बसवले जाणार असल्याचं सांगितलं होतं. आता तुमच्या गाड्यांमध्ये कर्कश आवाजांच्या हॉर्नच्या जागी मधूर आणि सुरेल आशा भारतीय वाद्यांमध्ये आता तुमच्या गाड्यांचे हॉर्न वाजणार आहेत आणि यासंबंधित लवकरच कायदा करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली होती.

पुण्यात केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, पुणे मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. संरक्षण विभागाकडून पुण्यातील विमानतळासाठी जागा मिळणे गरजेचं आहे. त्यासाठी संरक्षण विभागाकडून चंदीगडच्या आणि पुण्याच्या जागेची अदलाबदल करण्यात येईल. त्याला मंजुरी मिळाली आहे.

पुण्यातील नदी प्रकल्पालाही मंजुरी मिळाली आहे. नागपुरप्रमाणे पुण्यातही वाघोली ते शिरुर हा रस्ता पन्नास हजार कोटी खर्च करून बांधण्याचा विचार सुरु आहे. हा रस्ता तीनमजली असेल. दोन मजले उड्डाणपूलाचे तर शेवटचा तिसरा मजला मेट्रोसाठी असेल. यासाठी मदत करण्यास केंद्र तयार आहे, त्यासाठी राज्याने जीएसटी माफ करावा, असे त्यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले की, आमचा मुंबई नरिमन पॉईंटला दिल्लीला जोडण्याचा प्रयत्न आहे. यासाठी राज्य सरकार सोबत लवकरच बैठक घेणार आहे.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा