'स्पेशल' खेळाडूंसाठी फिटनेस ट्रेनिंग

Mumbai
'स्पेशल' खेळाडूंसाठी फिटनेस ट्रेनिंग
'स्पेशल' खेळाडूंसाठी फिटनेस ट्रेनिंग
'स्पेशल' खेळाडूंसाठी फिटनेस ट्रेनिंग
See all
मुंबई  -  

युनिस केन्नेडी श्रीवर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने जगभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्याचप्रमाणे मुंबईत इंडियन डेंटल असोसिएशनने शुक्रवारी प्रभादेवीतल्या स्पेशल ऑलिम्पिकमधील दिव्यांग मुलांच्या दातांची तपासणी करत त्यांना मोफत फिटनेस ट्रेनिंगही दिले.

'स्पेशल ओलिम्पिक महाराष्ट्र, भारत' या संस्थेतर्फे प्रभादेवीत हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी मुंबईतील एकूण 100 मुलांचे चेकअप येथे करण्यात आले. दिव्यांग मुलांना क्रीडा क्षेत्रात तंदुरस्त ठेवण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी म्हणून इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे हे मोलाचे पाऊल उचलण्यात आले. या संपूर्ण आठवड्यात मुंबईतील दिव्यांग मुलांना शाळेमध्ये फिटनेसचे धडे देण्यात येतील.

दिव्यांग मुलांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी विविध उपक्रम देखील या दिवशी राबवले जातात. युनिस केन्नेडी यांचा वारसा कायम राहावा यासाठी दिव्यांग अॅथलेटिकमध्ये सहभागी होणाऱ्या दिव्यांगांना नवीन जीवन प्रदान करण्याचे प्रयत्न या माध्यातून केले जातात. हा दिवस 2016 मध्ये सप्टेबर महिन्यातील चौथ्या शनिवारी साजरा करण्यात आला होता. 2017 मध्ये हा दिवस 20 जुलै पासून साजरा केला जात आहे. कारण 20 जुलै 1968 ला अमेरिकेतील इलिनॉइसमधील शिकागो येथे पहिल्यांदा स्पेशल ऑलिम्पिक खेळाची सुरुवात करण्यात आली होती.


कोण होते युनिस केन्नेडी श्रीवर?

मूळचे अमेरिकेचे असलेले युनिस केन्नेडी श्रीवर यांचा जन्म 1 जुलै 1921 रोजी झाला होता. ते नेहमी समाजिक कार्यात अग्रेसर होते. त्यांनी दिव्यांग मुलांसाठी स्पेशल ऑलिम्पिकची स्थापना केली होती.

समाजात क्रिकेट प्रेमी खूप आहेत. त्याच बरोबर आज हॉकी आणि कबड्डीसारख्या खेळांनाही सध्या प्रसिद्धी मिळताना दिसत आहे. काही दिवसांनी स्पेशल ओलिम्पिक देखील मोठे होईल. त्यासाठी असोसिएशनतर्फे प्रयत्न सुरू आहेत. या दिवसाच्या निमित्ताने आम्ही देशातील सर्व क्लिनिकमध्ये दिव्यांग मुलांसाठी मोफत चेकअप ठेवले आहे.

- डॉ. अशोक ढोबळे, जनरल सेक्रेटरी, इंडियन डेंटल असोसिएशनडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.