सतीश सबनीस स्मृती बुद्धिबळ स्पर्धेला भरघोस प्रतिसाद, दिव्यांग स्पर्धकांनी दाखवली चमक

सतीश सबनीस स्मृती बुद्धिबळ स्पर्धेला भरघोस प्रतिसाद, दिव्यांग स्पर्धकांनी दाखवली चमक
सतीश सबनीस स्मृती बुद्धिबळ स्पर्धेला भरघोस प्रतिसाद, दिव्यांग स्पर्धकांनी दाखवली चमक
सतीश सबनीस स्मृती बुद्धिबळ स्पर्धेला भरघोस प्रतिसाद, दिव्यांग स्पर्धकांनी दाखवली चमक
सतीश सबनीस स्मृती बुद्धिबळ स्पर्धेला भरघोस प्रतिसाद, दिव्यांग स्पर्धकांनी दाखवली चमक
See all
मुंबई  -  

शिवाजी पार्क आणि क्रिकेट हे गेली अनेक वर्ष रुढ झालेलं समीकरण. आंतरराष्ट्रीय दर्जाचे एकाहून एक सरस क्रिकेटपट्टू देणा-या शिवाजी पार्क जिमखान्याच्या प्रांगणात रविवारी 'बुद्धिबळवीरां'ची उपस्थिती पहायला मिळाली. निमित्त होतं चौथ्या सतीश सबनीस स्मृती बुद्धिबळ स्पर्धेचं. पटावरच्या 64 काळ्या-पांढ-या घरांवर अधिराज्य गाजवू पाहणा-या विविध वयोगटातल्या 300हून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. निवृत्त न्यायाधीश अभय ठिपसे, नाटक-चित्रपटांमधला 'सही' कलावंत भरत जाधव, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कसोटीपटू प्रवीण आमरे यांच्यासह विविध क्षेत्रातल्या नामवंतांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा रंगला. एक लाख एकावन्न हजार रुपयांच्या रकमेच्या पारितोषिकांनी विजेत्यांना गौरवण्यात आलं. मोहम्मद नुबेरशहा शेखने यंदाच्या स्पर्धेच्या विजेतेपदावर तर आकाश दळवीने उप-विजेतेपदावर नाव कोरलं.  झेन मीडिया प्रा. लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक मिलिंद सबनीस यांच्या पुढाकाराने आयोजित होणा-या स्पर्धेचं हे चौथं वर्ष आहे. दिव्यांग स्पर्धकांचा सहभाग हे या वर्षीच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य ठरलं.

अजिंक्यपदविजेता, उप-विजेत्यासह  वय वर्ष सहा, आठ, दहा, बारा, चौदा, सोळाखालील स्पर्धक मुले-मुली, सर्वोत्तम महिला स्पर्धक, सर्वोत्तम ज्येष्ठ नागरिक स्पर्धक आदींनी स्पर्धेची खुमारी वाढवली. मुंबईच नव्हे तर उर्वरित महाराष्ट्रातील स्पर्धकांनीही आवर्जून या स्पर्धेत सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या तीन वर्षांच्या तुलनेत चढत्या क्रमाने वाढणारी स्पर्धकसंख्या हे यावर्षीच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य ठरलं. गेल्या वर्षी स्पर्धेत सुमारे दीडशे स्पर्धक सहभागी झाले होते. यावर्षी ही संख्या दुपटीहून अधिक वाढली. या स्पर्धेच्या माध्यम प्रायोजकत्वाची भूमिका 'मुंबई लाइव्ह'ने निभावली. मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त जयराज फाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळच्या प्रहरी स्पर्धेचं उद्घाटन झालं. उत्तरोत्तर वाढत जाणा-या उन्हाबरोबर स्पर्धेचा ज्वरही वाढत गेला आणि संध्याकाळच्या रम्य प्रहरी नामवंतांच्या उपस्थितीत स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रंगला.

सतीश सबनीस ओपन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेविषयी-

सतीश सबनीस फाऊंडेशन आणि झेन लाइव्ह मीडियाचे प्रमुख मिलिंद सबनीस यांचे वडील दिवंगत सतीश सबनीस हे भारतीय बुद्धिबळ क्षेत्रातील एक नावाजलेले व्यक्तिमत्व होते. त्यांना स्वत:ला बुद्धिबळाची प्रचंड आवड आणि ज्ञान होते. ते स्वत: अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये खेळले. भारतीय बुद्धिबळपटूंना उत्तम व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने त्यांनी 1984 मध्ये प्रथम आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले. त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. इतकेच नाही, तर त्यांनी 1986 मध्ये दुबई बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे व्यवस्थापकपदही भूषविले होते. भारताचा ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंद याचा हा पहिला परदेश दौरा होता. ग्रॅण्डमास्टर प्रवीण ठिपसे, अभय ठिपसे, भाग्यश्री साठे अशा प्रथितयश बुद्धिबळपटूंना सतीश सबनीस यांनी वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले होते.माझे वडील सतीश सबनीस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गेल्या चार वर्षांपासून सतीश सबनीस फाऊंडेशन मुंबईत सतीश सबनीस ओपन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा भरवते. सतीश सबनीस हे स्वत: बुद्धिबळ खेळाडू होते. बुद्धिबळ या खेळाला प्राधन्य मिळावे, तसेच त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे ज्या खेळावर प्रेम होते तो खेळ जपला जावा यासाठी मी एक खारीचा वाटा उचलत आहे. या स्पर्धेत गतवर्षी 110 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यंदा 300 हून अधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे स्पर्धेत दृष्टिहीन खेळाडूंचा सहभाग आहे, याचा मला विषेश आनंद वाटत आहे. 

- मिलिंद सबनीस, ट्रस्टी, सतीश सबनीस फाऊंडेशन

पूर्वी बुद्धिबळ खेळण्यासाठी काही विशेष वयोगटातील व्यक्तीच सहभागी असलेल्या दिसायच्या. आता तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे अगदी लहान मुले हा खेळ खेळताना दिसतात. मी स्वतः एक खेळाडू आहे. त्यामुळे बुद्धिबळाला एक वेगळं व्यासपीठ मिळताना बघून मलाही आनंद होत आहे. पूर्वीच्या तुलनेत भारतात सध्या बुद्धिबळच्या खेळाडूंची संख्या वाढली आहे हे एवढं नक्कीच. सध्या बुद्धिबळच्या या स्पर्धेत सतीश सबनीस फाऊंडेशन एका वेगळ्या ढंगात सर्वच खेळाडूंसाठी ही स्पर्धा भरवते याचा मला विषेश आनंद आहे. 

- जयराज फाटक, माजी महापालिका आयुक्त


मला या खेळातले फार काही कळत नाही. परंतु मला या खेळातल्या चाली माहीत आहेत. टेक्निक शिकणे बाकी आहे. मी वेळ मिळेल तेव्हा फोनवर गेम खेळतो. पुढच्या वर्षी या स्पर्धेत मीही सहभागी होईन.

- भरत जाधव, अभिनेता

सतिश सबनीस रॅपीड चेस टुर्नामेंटचे विजेते

मोहम्मद शेख- विजेता
आकाश दळवी- उपविजेता6 वर्षाखालील वयोगट
शौर्य खाडीलकर- विजेता
कैरव ठक्कर- उपविजेता
साज मांडलिक- विजेती
क्रिशी चौडकी- उपविजेती

8 वर्षांखालील वयोगट
जैसल शाह- विजेता
क्षत्रिया वेखंडे- उपविजेता
सुहानी लोहिया- विजेती
अपेक्षा मारभळ- उपविजेती


10 वर्षाखालील वयोगट
ओम कदम- विजेता
अक्षित झा-  उपविजेता
सायली आमरे- विजेती
राशी चौहान- उपविजेती

12 वर्षाखालील वयोगट
क्रिश बुटाला- विजेता
अनिरुद्ध पोटवाड- उपविजेता
व्रिशा शहा- विजेती
निशिगंधा रामगुडे- उपविजेती

14 वर्षाखालील वयोगट
वेदांत पानसरे – विजेता
वरुण वाघ- उपविजेता
कनिका चिटणीस- विजेती
वनश्री कुणेकर- उपविजेती

16 वर्षाखालील वयोगट
पुष्कर डेरे – विजेता
चंदन पलाश- उपविजेता
वैभवी जाधव- विजेती
हर्षदा सावंत- उपविजेती

उत्कृष्ट महिला खेळाडू
भाग्यश्री ठिपसे- विजेती
धनश्री राठी- उपविजेतीLoading Comments
© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.