Advertisement

तुमची मुलं मॉलच्या गेमिंग झोनला जातात? Infinity mall मध्ये घडला धक्कादायक प्रकार

Infiniti Mall व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल

तुमची मुलं मॉलच्या गेमिंग झोनला जातात? Infinity mall मध्ये घडला धक्कादायक प्रकार
SHARES

मॉलमधल्या गेमिंग जोनला बच्चे कंपनीसोबतच तरूण तरूणींचीही पसंती असते. त्यामुळे मॉलमधल्या फुडकोर्टसोबतच आणखी एका जागी गर्दी असते ते म्हणजे गेमिंग झोन. मुंबईतल्या अशाच एका मॉलमध्ये गेम खेळताना एक घटना घडल्याचे समोर आले आहे. 

ट्रॅम्पोलिनच्या घटनेत १९ वर्षीय तरुणाचा पाय फ्रॅक्चर झाल्यानंतर बांगूर नगर पोलिसांनी इन्फिनिटी मॉलच्या गेमिंग झोनच्या व्यवस्थापनाविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. फ्री प्रेस जर्नल ने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

तक्रारदार, बोरा आणि त्यांचे नातेवाईक 18 जून रोजी लिंक रोड, मालाड (प.) येथील मॉलमध्ये गेमिंग झोनमध्ये गेले होते. ते ट्रॅम्पोलिनवर उडी मारत असताना, दोन स्प्रिंग्स कथितपणे तुटल्या, त्यामुळे त्याच्या गुडघ्याला लागले आणि फ्रॅक्चर झाले.

घाटकोपरचे रहिवासी असलेले बोरा यांना कुर्ल्यातील क्रिटिक केअर एशिया रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी दुखापतीची पुष्टी केली आणि बांगूर नगर पोलिसांना माहिती दिली.

ट्रॅम्पोलिनचे स्प्रिंग खराब झाले होते

बोरा म्हणाले, “मी माझ्या नातेवाईकांसोबत वेळ घालवत होतो पण ट्रॅम्पोलिनचे दोन स्प्रिंग निखळले आणि मी धातूच्या पृष्ठ भागावर पडलो. एक स्प्रिंग माझ्या गुडघ्यावर आदळला, त्यामुळे खूप वेदना झाल्या.

कर्मचाऱ्यांनी तातडीने अॅम्ब्युलन्स बोलावली आणि मला क्रिटिक केअर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी माझ्या उजव्या पायात फ्रॅक्चर झाल्याचे निदान केले.

बोरा यांनी 19 जून रोजी केलेल्या तक्रारीनंतर, पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 336 (जीवन किंवा वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणारे कृत्य) आणि 338 (इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कृत्यामुळे गंभीर दुखापत करणे) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. 



हेही वाचा

मुंबईत मान्सूनचे आगमन कधी होणार? IMD ची मोठी अपडेट

दादरमध्ये सापडला गांजाचा मोठा साठा, पोलिसांचा तपास सुरू

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा