Advertisement

उत्सवाला महागाईचे चटके! सुक्या मेव्यांच्या दरात वाढ

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असो वा घरगुती, या ठिकाणी सुक्या मेव्याचा प्रसादासाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो.

उत्सवाला महागाईचे चटके! सुक्या मेव्यांच्या दरात वाढ
SHARES

मुंबईत (mumbai) तसेच सर्वत्र गणेशोत्सवासाठी (ganesh festival) केल्या जाणाऱ्या गोड पदार्थात वापरला जाणारा सुकामेवा यंदा भक्तांचा खिसा हलका करीत आहे.

सर्वच सुकामेव्याच्या दरात 25 ते 30 टक्के वाढ झालेली आहे. प्रामुख्याने काजू, बदाम व अंजीर यांच्या दरातील वाढ मोठी आहे. परिणामी मोदकासह प्रसादासाठीचे गोड पदार्थ महागले (inflation) आहेत.

विशेष म्हणजे चांगल्या काजूसाठी किलोमागे 1 हजार ते 1050 - 1100 रुपये मोजावे लागत आहेत.

तर अंजीर 1600 रुपये किलोवर पोहोचले आहेत. तर 21 मोदकांसाठी 300 रुपयांहून मोजावे लागत आहेत.

गणेशोत्सवात मोदक (modak) आणि मोतीचूरच्या लाडवांना सर्वाधिक मागणी असते. या दोन्हीमध्ये सुकामेव्याचा वापर होतो. त्याचवेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असो वा घरगुती, या ठिकाणी सुक्या मेव्याचा (dry fruits)  प्रसादासाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळेच गणेशोत्सवात सुकामेव्याची मागणी वाढती असताना दर देखील प्रचंड वाढले आहेत.

प्रसादामध्ये काजूला सर्वाधिक मागणी असते. मात्र मागील महिन्यात 750 ते 800 रुपये प्रति किलो असलेला काजू आता किमान 950 रुपये प्रति किलो झाला आहे.

950 रुपयांत तुकडा काजू आहे. चांगल्या व मोठ्या काजूचे दर 1 हजार ते 1050 - 1100 रुपये प्रति किलोवर गेले आहेत. अनेक ठिकाणी मोदकामध्ये नारळाच्या सारणासह अंजीरचे तुकडे टाकले जातात.

मोदकासाठीची पिठी 140 रुपयांवर

गणपतीला मोदकाचा नैवैद्य असतो. घरगुती गणपतीत हा मोदक प्रामुख्याने उकडीचा असून तो तांदळाच्या पीठीपासून तयार होतो. एव्ही उत्तम दर्जाचा तांदूळ 60 रुपये किलोदरम्यान असतो. मात्र त्याच तांदळाची पीठी 120 ते 140 रुपये किलोने बाजारात विक्री होत आहे.

वाढत्या मागणीमुळे दरवाढ झाल्याचे व्यापारी सांगतात. हल्ली गणेशोत्सवात महाप्रसाद किंवा प्रसाद वितरणला महत्त्व वाढले आहे.

सार्वजनिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर महाप्रसादाचे वितरण होते. त्यामध्ये बुंदीचे लाडू, बुंदीचे मोदक यांचा समावेश सर्वाधिक असतो. त्यामुळेच बेसन, तूप, काजू व किसमिस यांची मागणी आता पुढील 12 ते 15 दिवस सर्वधिक असेल, असे व्यापारी सांगतात.

उत्तम दर्जाला महत्त्व

प्रसादासाठीच्या घटकांच्या दरांत वाढ नक्कीच झाली आहे. प्रामुख्याने बुंदी किवा मोतीचूरसाठी बेसन आणि सुकामेवा महागला आहे. परंतु प्रसाद महटले की गणेशभक्त किमतीचा फार विचार करीत नाहीत.

उत्तम दर्जाच्या प्रसादाला महत्त्व असते. घटक महागल्याने प्रसादाच्या किमतीत 15 ते 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र मागणी कमी झालेली नाही,' असे लालबाग येथील मिठाई विक्रेते सिद्धांत राक्षे यांनी सांगितले.

पाव किलो मोदक 250 वर

गणेशोत्सव काळात प्रसादासाठी विविध प्रकारचे मोदक बाजारात असतात. मात्र सर्वात साधे माव्याचे (पेड्याचे) मोदकदेखील 250 रुपये प्रति पाव या दराने विक्री होत आहेत.

एका पावात 12 ते 14 मोदक बसतात. गणपतीला 21 मोदकांचा नैवेद्य असतो. यामुळेच भक्तांना 21 मोदकांसाठी 300 रुपयांहून अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. गणेशोत्सव जसजसा जवळ येईल, हा आकडा वाढत जाईल, असे मिठाई व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

विविध मोदकांचे दर

प्रकार आणि  दर (पाव किलो रुपये)

मावा 240 -250 

चॉकलेट 260 - 280  

केशर 270 - 280

स्ट्रॉबेरी 280 -290 

मैंगो 270 - 280

काजू 350 - 360

अंजीर 380 - 400

सुकामेवा 420 -440



हेही वाचा

मरीन ड्राइव्हवरुन वांद्रे आता 15 मिनिटांत गाठता येणार

BMC शिवाजी पार्कचे भाडे वाढणार?

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा