मुंबईकरांच्या पाण्याला घाणीची साथ

Mumbai
मुंबईकरांच्या पाण्याला घाणीची साथ
मुंबईकरांच्या पाण्याला घाणीची साथ
मुंबईकरांच्या पाण्याला घाणीची साथ
See all
मुंबई  -  

धारावी - जलवाहिन्यांवरील अनधिकृत बांधकामे, तसेच त्यावरील कचरा हटवून सर्व जलवाहिन्या मोकळ्या करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र असं असताना देखील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धारावी (प.) इथल्या माहीमच्या बंद असलेल्या फाटक परिसरातील जलवाहिन्या कचऱ्याच्या विळख्यात सापडल्याचे चित्र आहे. यामुळे माहीमच्या बंद असलेल्या फाटक परिसरात दुर्गंधी पसरल्याने स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाचे पितळ उघडे पडले आहे. त्यामुळे सुंदर स्वच्छ निरोगी जीवन जगण्याची स्वप्ने दाखवणारे तसेच स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानासाठी सरकारी तिजोरीची उधळण करणारे पालिका प्रशासन कुठे आहे? असा प्रश्न संतापलेली जनता विचारत आहे.या परिसरात भंगार रिसायकलिंग करणारे अनेक कारखाने आहेत. वस्तूचे रिसायकलिंग करताना त्यातून निघणारा टाकाऊ कचरा उदा. थंड पेयाच्या बाटल्यांचे रॅपर, रबराचे बुच, टाकाऊ रंगांचे डबे, औषधे, कापड चिंध्या, प्लास्टिकच्या पिशव्या, थर्माकॉल, चपलांचे सोल, डब्यांच्या स्टिकरचा कचरा हे कारखानदार रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत राजरोसपणे माहीम - धारावी उड्डाणपुलाच्या खाली टाकतात. त्यामुळे पुलाखालून गेलेल्या जलवाहिनी परिसराला डम्पिंग ग्राऊंडचे स्वरूप प्राप्त झाले असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. या दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात आल्याचे या परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे. या कारखानदारांना कुणाकडून अभय मिळते? तसेच पालिका अधिकाऱ्यांना हे दिसत नाही का? असा प्रश्न स्थानिक समाजिक कार्यकर्ते डॉ. युसूफ खान यांनी उपस्थित केला आहे.

वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात एक नवीन संकटाचा सामना करावा लागणार आहे. जलवाहिनी लगतचा सर्व कचरा काढण्यात आला होता. सध्यस्थितीबाबत माहिती उपलब्ध नाही. परंतु सदरील ठिकाणची पाहणी करून तात्काळ जलवाहिनी परिसरातील कचरा हटवून कचरा टाकणाऱ्या सर्व भंगार कारखानदारावर कडक कारवाई करण्यात येईल असे पालिका जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त रमाकांत बिराजदार यांनी सांगितले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.