Advertisement

जुहू: 16 मार्चला #JustWalkIndia चे आयोजन

वॉकेथॉनसाठी तीन वेगवेगळे मार्ग असतील. यात 3 किमी, 5 किमी आणि 10 किमी चालणे असे टप्पे आहेत.

जुहू: 16 मार्चला #JustWalkIndia  चे आयोजन
SHARES

मुंबईकरांच्या धावपळीच्या जीवनात फिटनेस आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ काढणे खूप कठीण झाले आहे. यासाठीच मुंंबईकरांना वेळ मिळावा तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेता मुंबईतील (mumbai) जुहू (juhu) येथे #JustWalkIndia वॉकेथॉन सुरू करण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम 16 मार्च 2025 रोजी पार पडणार आहे.

वॉकेथॉनसाठी (walkathon) तीन वेगवेगळे मार्ग असतील. यात 3 किमी, 5 किमी आणि 10 किमी चालणे असे टप्पे आहेत.

मुंबईतील #JustWalkIndia वॉकेथॉनसाठी नोंदणी किंमत पुढीलप्रमाणे:

3 किमी फॅमिली वॉक: 799 रुपये

यामध्ये टी-शर्ट, रिफ्रेशमेंट्स, डिजिटल प्रमाणपत्र, पदक आणि वेळेनुसार बीआयबी देण्यात येणार आहे.

5 किमी फन वॉक: 899 रुपये

यामध्ये वेळेनुसार बीआयबी, रिफ्रेशमेंट्स, डिजिटल प्रमाणपत्र, पदक आणि टी-शर्ट देण्यात येणर आहे.

10 किमी प्रो वॉक: 999 रुपये

यामध्ये वेळेनुसार बीआयबी, रिफ्रेशमेंट्स, डिजिटल प्रमाणपत्र, पदक आणि टी-शर्ट देण्यात येणार आहे.

#JustWalkIndia चे ठिकाण:

ऋतांबरा कॉलेज, निर्मला देवी अरुण कुमार आहुजा रोड, जेव्हीपीडी स्कीम, जुहू, मुंबई, महाराष्ट्र 400049



हेही वाचा

महिला बचत गटांसाठी 10 उमेद मॉल्स उभारण्याचे लक्ष्य : मुख्यमंत्री

विमानतळाजवळील अतिक्रमण न हटवल्याने उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा माफीनामा

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा