Advertisement

वाढदिवस ठरला 'खुशबूचा' मृत्यूदिवस!

ज्या दिवशी जन्म घेतला त्या दिवसाचं सेलिब्रेशन करत असतानाच काळाने घाला घालावा यापेक्षा नियतीचा दुष्टपणा तो कुठला? असाच प्रकार घडला आहे. कमला मिल कंपाऊंड आग दुर्घटनेतील बळी ठरलेल्या खुशबू मेहता (२९) हिच्यासोबत.

वाढदिवस ठरला 'खुशबूचा' मृत्यूदिवस!
SHARES

जगात कुणी कधी यावं आणि कधी जावं, हे नियतीचं ठरवते. ज्या दिवशी जन्म घेतला त्या दिवसाचं सेलिब्रेशन करत असतानाच काळाने घाला घालावा यापेक्षा नियतीचा दुष्टपणा तो कुठला? असाच प्रकार घडला आहे. कमला मिल कंपाऊंड आग दुर्घटनेतील बळी ठरलेल्या खुशबू मेहता (२९) हिच्यासोबत.



खूशबू मेहता ही महिला आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी कमला मिल कंपाऊंडमधील पबमध्ये गेली होती. खूशबूचा २८ डिसेंबरलाच वाढदिवस होता. त्यानिमित्ताने ती हॉटेल मोजोस बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पबमध्ये पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण, पबमध्ये आणि हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत खुशबूचा गुदमरुन मृत्यू झाला. वाढदिवसाला सेलिब्रेशन करण्याची खूप मोठी किंमत खुशबूने मोजली.

खुशबू खेतवाडीला राहत होती. खुशबूच्या जाण्यानं मेहता कुटुंबीयांवर दुः खाचा डोंगर कोसळला आहे. खुशबूचे आजोबा बाबुलाल मेहता यांनी या संपूर्ण घटनेसाठी रेस्टाॅरंटच्या मालकाला जबाबदार ठरवलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हॉटेलमध्ये मूलभूत सोयीसुद्धा नसल्याचं बाबुलाल यांचं म्हणणं आहे.



कमला मिल्समधील पबला लागलेल्या आगीत १४ जणांचा गुदमरुन मृत्यू झाला असून ५५ जण जखमी झाले आहेत. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि काही जणांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलं आहे.



हेही वाचा-

कमला मिलमध्ये मृत्यूला जवळून पाहणारी माला कश्यप

हुक्क्यामुळे लागली अाग!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा