Advertisement

हुक्क्यामुळे लागली अाग!


हुक्क्यामुळे लागली अाग!
SHARES

कमला मिल अागीत अातापर्यंत १४ जणांचा जीव गेला असून ही अाग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात अाहेत. मात्र ही अाग हुक्क्यामुळे लागली, असं प्रतीक ठाकूर या एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं. या अागीत प्रतीकचे दोन्ही हात भाजले अाहेत.

मोजोस ब्रिस्टो हाॅटेलमध्ये जवळपास १५० हून अधिक माणसं होती. सर्वांनी दारू प्यायली असल्यामुळे अाणि बाहेर पडायचा मार्ग अरुंद असल्यामुळे बाहेर पडताना सर्वांनाच त्रास होत होता. हुक्क्यामुळे ही अाग लागली अाणि क्षणार्धात पसरत गेली. अाग पाहिल्यानंतर मी अारडाअोरड करायला सुरुवात केली, असं प्रत्यक्षदर्शी प्रतीक ठाकूर यांनं सांगितलं.

माझी पत्नी तोरल कुठेही दिसूनाशी झाल्यामुळे मी त्या अागीत पुन्हा शिरलो. त्या गोंधळात मला तोरलचा भाऊ मयांक भेटला. त्याने तोरल अात नसल्याचे सांगितल्यावर मी अाणि मयांक दोघेही बाहेर पडलो. तोरलही अाधीच बाहेर पडली होती. अाम्ही ८ ते ९ जण होतो, पण सर्व सुखरूप असल्याचे कळत नव्हते, असंही प्रतीक ठाकूरनं सांगितलं

तोरलचा भाऊ डीजेबरोबर बाथरूममध्येच अडकला होता. या वेळी त्यांना सुरक्षारक्षक बाहेर येऊ देत नव्हते. अाणखी काही काळ ते अात कोंडून राहिले असते तर गुदमरून त्यांचा जीव गेला असता. बाहेर पडण्याचा मार्ग अरुंद असल्यामुळे गोंधळ उडाला होता, असंही त्यानं सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा