शीवमधील राणी लक्ष्मीबाई उद्यानाचं उद् घाटन

 Pratiksha Nagar

See all

शीव - येथील राणी लक्ष्मीबाई उद्यानाचं सोमवारी मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांच्या हस्ते उद् घाटन  करण्यात आलं. भाजपा वॉर्ड क्र.167च्या नगरसेविका राजश्री शिरवाडकर यांच्या प्रयत्नांनी या उद्यानाचं काम करण्यात आलंय. या कार्यक्रमास शीव कोळीवाडा विभागाचे सर्व पदाधिकारीही उपस्थित होते. हे उद्यान लहान मुलांसाठी बांधण्यात आलं असून अनेक झाडं या उद्यानात लावण्यात आली आहेत. सकाळी 6 ते दुपारी 12 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 10 पर्यंत हे उद्यान सर्वांसाठी खुलं असेल.

'मुंबईत रिकामी जागा मिळणं कठीण आहे. जिथे ती आहे, त्या जागेचा चांगला उपयोग भाजपाचे कार्यकर्तेच करू शकतात. म्हणूनच राजश्री शिरवाडकर यांनी हे उद्यान बांधून दिलं आहे,' असं या वेळी आशीष शेलार म्हणाले.

Loading Comments