Advertisement

गावची जमीन, सात बारा आणि तुम्ही...


गावची जमीन, सात बारा आणि तुम्ही...
SHARES

दादर - दादरच्या रामभाऊ म्हाळगी हॉल मध्ये 'जमिनीचा सात बारा' हा कार्यक्रम शुक्रवारी झाला. जमिनीचा सात बारा म्हणजे काय, गावी जमीन आहे आणि ती विकसित करायची असेल तर काय, अशा विविध गोष्टींबाबत माहिती या कार्यक्रमात देण्यात आली.

आपली जमीन ही आपण कशाप्रकारे सात बाराच्या मदतीनं व्यवस्थित सांभाळू शकतो आणि त्या जमिनीची सुरक्षा ही सात बारावरच अवलंबून असते आणि त्यासाठी जमिनीचा सात बारा हा विषय समजून घेणं आवश्यक आहे. या उद्देशानं 'सॉमरसेट फाउंडेशन' वर्षभरापासून हा कार्यक्रम राबवते आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अमेय अमरे होते. त्यांनी सात बारा हा विषय उपस्थितांना समजावून त्यांना योग्य मार्गदर्शन केलं. लोकहिताच्या, महत्त्वाच्या विषयांवर आम्ही नेहमीच भर देत असल्याची प्रतिक्रिया संस्थेचे अध्यक्ष अजय यादवराव यांनी दिली. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement