Advertisement

29 मार्चपासून कोल्हापूर ते नवी मुंबई नियमित विमानसेवा

ही सेवा सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रांत उपलब्ध होणार असल्याने प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे.

29 मार्चपासून कोल्हापूर ते नवी मुंबई नियमित विमानसेवा
SHARES

29 मार्चपासून कोल्हापूर (kolhapur) ते नवी मुंबई (navi mumbai) मार्गावर 'इंडिगो' (indigo) कंपनीची विमानसेवा (flight) आठवड्यातील सातही दिवस सुरू होत आहे.

ही सेवा सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रांत उपलब्ध होणार असल्याने प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे.

कोल्हापूरकरांना आता मुंबईतील (mumbai) आपली कामे आटोपून त्याच दिवशी परतणे शक्य होणार आहे.

या नवीन विमानसेवेमुळे कोल्हापूर आणि मुंबईतील अंतर केवळ तासाभराचे उरले असून, पश्चिम महाराष्ट्रातील (maharashtra) प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. खासदार धनंजय महाडिक यांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता.

ठळक वैशिष्ट्ये

1) दोन सत्रांत सेवा : सकाळी मुंबईला जाऊन कामे पूर्ण करून रात्री कोल्हापुरात परतण्याची सुविधा.

2) नवी मुंबई कनेक्टिव्हिटी : ही सेवा थेट नवी मुंबई विमानतळावरून कार्यान्वित होणार आहे.

3) तिकीट दर : या प्रवासाचे सुरुवातीचे तिकीट दर 7,600 रुपये इतके असणार आहेत.

4) विकासाला चालना : कोल्हापूर विमानतळावर नवीन टर्मिनसचे काम सुरू असतानाच ही सेवा सुरू झाल्याने पर्यटनाला आणि स्थानिक उद्योजकांना मोठा फायदा होणार आहे.

अशा असतील फेऱ्या

1) सकाळची फेरी : नवी मुंबई सकाळी 8:00 ते कोल्हापूर सकाळी 9:15 वाजता.

2) कोल्हापूर सकाळी 9:35 ते नवी मुंबई सकाळी 10:35

3) संध्याकाळची फेरी : नवी मुंबई संध्याकाळी 7:20 ते कोल्हापूर रात्री 8:30 वाजता.

4) कोल्हापूर रात्री 8:50 ते नवी मुंबई ते रात्री 9:50 वाजता



हेही वाचा

25 फेब्रुवारीला 10 नामनिर्देशित नगरसेवकांची घोषणा होणार

महिन्याभरातच एसी लोकलचा हार्बर लाईनला फटका

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा