जरा इकडे लक्ष द्या !

 Pratiksha Nagar
जरा इकडे लक्ष द्या !
जरा इकडे लक्ष द्या !
See all

सायन - कोळीवाडातल्या गुरु तेग बहादूरनगर या स्थानकाबाहेरचं झाड मोडकळीस आलं आहे. हे झाड गेली १० वर्ष जुनं असून त्याला वाळवी लागली आहे. झाडाचा खालचा भाग पूर्णपणे पोकळ झालाय. त्यामुळे कोणत्याही क्षणी हे झाड कोसळू शकते. मात्र वारंवार तक्रार करून देखील पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार स्थानिक विक्रेत्यांनी केली आहे.

'झाड कापायचेच असेल तर त्यासाठी तेथील विक्रेत्यांनी १० हजार रुपये देऊन हे काम करून घ्यावे' असे उत्तर देत पालिका कर्मचाऱ्यांनी आपले हात झटकले आहेत. जोरदार पाऊस पडल्यास झाड कोसळून मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे 'पालिकेने लवकरात लवकर याकडे लक्ष द्यावे' अशी मागणी स्थानिक विक्रेते सुरेश परमार यांनी केली.

Loading Comments