Advertisement

कोकणातील हापूस आंबा अखेर मुंबईत दाखल


कोकणातील हापूस आंबा अखेर मुंबईत दाखल
SHARES

मुंबईसह राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोकणातील हापूस आंब्याच्या हंगामातील पहिल्या मुहूर्ताच्या आंब्याच्या पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत. हंगामातील पहिला आंबा हा मुहूर्ताचा आंबा मानला जातो. त्यामुळे या आंब्याची विधिवत पूजा करून पूर्ण हंगाम चांगला जाऊ दे अशी प्रार्थनाही केली जाते. 

मिळालेल्या माहितीनुसार, देवगडमधील कुणकेश्वर येथील शेतकरी शंकर नाणेरकर यांनी हापूस आंब्याच्या २ पेट्या फळ बाजारातील व्यापारी अविनाश पानसरे यांना पाठवल्या आहेत. अगदी पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा आजच्या व्यापाऱ्यांनीही जपली आहे. त्यामुळे बाजारात आलेल्या हापूस आंब्याच्या पेटीची पूजा करण्यात आली.

मुहूर्ताचा आंबा बाजारात आला असला तरी हापूसचा मुख्य हंगाम सुरू व्हायला उशीर लागणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हापूस आंब्याचा खरा हंगाम सुरू होईल अशी माहिती मिळते.

हा मुहूर्ताचा आंबा असल्याने या आंब्याचे दर ठरवण्यात आले नसल्याचे समजतं. मात्र मुख्य हंगाम सुरू होईपर्यंत अधूनमधून बाजारात अशाप्रकारे २-४ पेट्या बाजारात येत असतात आणि या आंब्याला हजार ते दीड हजार रुपये डझन असा दर मिळतो.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा