Advertisement

...पुन्हा ते अमेरिकेत पोहोचलेच नाहीत!


...पुन्हा ते अमेरिकेत पोहोचलेच नाहीत!
SHARES

धैर्य ललानी (२६) अाणि विश्व ललानी (२२) ही दोन भावंड दोन अाठवड्यांपूर्वी अापल्या नातेवाईकांच्या लग्नासाठी अमेरिकेतून मुंबईत अाले होते. गुरुवारी रात्री त्यांची अात्या प्रमिला केनिया यांनीच त्यांच्यासाठी अाणि त्यांच्या मित्रांसाठी पार्टीचं अायोजन केलं होतं. या पार्टीला धैर्य अाणि विश्व यांच्यासह त्यांचे अन्य मित्रमंडळीही उपस्थित होती. त्यांच्यासाठी कमला मिल्स कपाऊंडमधील वन अबव्ह पबच्या प्रवेशद्वाराजवळच टेबल बुक करण्यात अालं होतं.


अात्या कुठे अाहे?

अाग लागली तेव्हा धैर्य अाणि विश्व दोघेही घाईगडबडीत बाहेर पडले अाणि इमारतीखाली अाहे. पण अात्या कुठे अाहे, असे म्हणत प्रमिला हिचा शोध सुरू झाला. अात्या अापल्यासोबत नाही, हे समजल्यानंतर दोघे पुन्हा अात शिरले. दोघांनीही अागीच्या भक्ष्यस्थानी जाऊन अात्याला शोधण्याचा प्रयत्न केला.


अखेर त्या तिघांचे मृतदेहच बाहेर अाले

अात्याला शोधता-शोधता दोघांचीही दमछाक झाली. पण धूर एवढा होता की, त्यांना बाहेर पडणं शक्य झालं नाही. अखेर त्या तिघांचेही मृतदेह पबच्या बाहेर पडले. या संपूर्ण घटनेमुळे ललानी अाणि केनिया या दोन्ही कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. लग्न अाटोपून पुन्हा अमेरिकेत जाण्याचा योग मात्र ललानी भावांच्या नशिबी अालाच नाही. त्याअाधीच गुरुवारी रात्री कमला मिल्समध्ये लागलेल्या अागीत काळानेच त्यांच्यावर घाला घातला.


भाऊ अमेरिकेवरून अाल्यामुळे जेवायला गेलो होतो - सिद्धार्थ श्राॅफ

माझे चुलत भाऊ अमेरिकेवरून मुंबईत अाले होते, म्हणून अाम्ही जेवायला या हाॅटेलमध्ये गेलो होते. साडेबारा वाजता अाग लागली, ती खालच्या दिशेने पसरत चालली होती. बाहेर पडण्याचा मार्ग अरुंद होता. शेवटी जीव वाचवण्यासाठी अाम्ही मदतीचा धावा करत होतो. बाथरूमचा सहारा घेतल्यानंतर मी कसाबसा त्यातून बाहेर पडलो. सुरुवातीला माझ्या शर्टाला अाग लागली, त्यानंतर पाठीला अाणि हाताला भाजल्यामुळे मला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात अाले. माझा चुलत भाऊ अमित शहा ३० ते ४० टक्के भाजला अाहे, असे सिद्धार्थ श्राॅफ याने सांगितले.


हेही वाचा -

कमला मिलमध्ये मृत्यूला जवळून पाहणारी माला कश्यप

हुक्क्यामुळे लागली अाग!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा