SHARE

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या अांबेडकरी अनुयानांना बेस्ट प्रशासनाकडून अाकर्षक गिफ्ट दिलं जाणार अाहे. जे तंबाखू खातात, त्यांनी यापुढं तंबाखू खाण्याचं वचन दिलं तर पहिल्या 500 प्रवाशांना बेस्ट प्रशासनाकडून हे गिफ्ट मिळणार अाहे. याबाबत शिवाजी पार्क इथं बेस्ट प्रशासनाकडून जनजागृती मोहिम राबवण्यात येणार अाहे.


रिदम फाऊंडेशनतर्फे जनजागृती

तंबाखू खाणे अारोग्यास हानीकारक असून एड्स असोसिएशन अाणि रिदम फाऊंडेशनतर्फे तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम तसंच त्यामुळे होणाऱ्या अाजारांविषयी जनजागृती करण्यात येईल. या मोहिमेत बेस्टचे कर्मचारीही सहभागी होणार अाहेत.


वैद्यकीय तपासणी शिबिराचंही अायोजन

बेस्टद्वारे यावेळी मोफक वैद्यकीय तपासणी शिबिराचे अायोजनही करण्यात अाले अाहे. यासोबतच बेस्टतर्फे अल्पोपहार, बटाटा वडा, समोरा, चिवडा, कचोरी, भाकरवडी पॅकेट, बिस्कीट, चहा, पाणी यांचे वाटपही केले जाणार अाहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या