माहिम - माहिम स्थानकावर उतरल्यानंतर बाहेर पडताच दादरला जाण्यासाठी बसने प्रवास करायचा असेल तर नागरीक 52, 70, 80 या नंबरच्या बस स्टॉपजवळ उभे रहतात. परंतु सध्या या बसस्टॉपवर अतिक्रमण झालेले पहायला मिळत आहे.
फुटपाथवर राहणारे लोक या बसस्टॉपवर फक्त बसत नाही, या बस स्टॉपचा वापर कपडे सुकवायलाही करत आहेत. त्याच बरोबर अंगणात बसावे असे हे लोक संध्याकाळच्या वेळी या बसस्टॉप समोर असलेल्या रस्त्यावर चटई पसरवून बसलेले असतात. या मंडळींनी केलेली घाण आणि बस स्टॉपची दुरवस्था पाहून सर्वसामान्य नागरीक उन्हाळ्यात आणि पावसाळ्यातही या बस स्टॉपचा आधार घेत नाहीत. म्हणून प्रशासनाने माहिम स्थानकाबाहेर झालेले झोपड्यांचे अतिक्रमण हटवावे आणि परिसर स्वच्छ करावा अशी मागणी स्थानिक नागरीक करत आहेत.