• सोनसाखळी चोरानं घेतला महिलेचा जीव
SHARE

कुर्ला - सोनसाखळी खेचून पोबारा करण्याच्या बेतात असलेल्या चोराच्या धक्क्यामुळे सपना शुक्ला या तरुणीला जीव गमवावा लागला. चोराच्या धक्क्यामुळे सपना लोकल खाली गेली आणि त्यात तिला जीव गमवावा लागला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शुभाशिष चरण मलिक याला बेड्या ठोकल्यात. दरम्यान गावी परत जाण्यासाठी आपल्याकडे पैसे नव्हते आणि त्यामुळे आपण चेन चोरीचा बनवा रचल्याची कबुली आरोपीने दिलीय. महिन्याभरापूर्वी शुभाशिष कामानिमित्त मुंबईत आला होता. मात्र कामधंदा मिळत नसल्यानं तो पुन्हा उडिसाला जात होता. मात्र तिकीटासाठी पैसे नसल्यानं त्यानं चोरीचा प्लॅन रचल्याच पोलीस तपासात उघड झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक बोरडे यानी दिली.

ही ह्रदयद्रावक घटना कुर्ला रेल्वे स्थानकावर घडलीय. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास सपना कुर्ला स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर ट्रेनची वाट पाहात उभी असताना अचानक साखळीचोरानं तिच्या गळ्यातील चेन लांबवत तिला जोरात धक्का दिला. त्यामुळे तोल जाऊन महिला रेल्वे रुळावर कोसळली. नेमकं त्याचवेळी समोरुन जणू मृत्यूुदूत म्हणून आलेल्या लोकल ट्रेनच्या खाली येऊन महिला गंभीर जखमी झाली. आरपीएफच्या मदतीनं महिलेला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती आरिफ अंसारी यांनी माहिती दिली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या