Advertisement

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचा खोळंबा

मालगाडी रुळावरून घसरल्यानंतर 'या' ट्रेन रद्द

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचा खोळंबा
SHARES

पालघर येथे झालेल्या मालगाडीच्या अपघातानंतर अनेक तास उलटूनही पश्चिम रेल्वेवरील सेवा विस्कळीत असल्याचं पाहायला मिळत आहे.

पालघर यार्डमध्ये मालगाडीच्या काही वॅगन रुळावरून घसरल्याने चर्चगेट ते डहाणू दरम्यानच्या सहा अप आणि पाच डाऊन लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर डाऊन सेक्शनमधील एक ट्रेन विरारमध्ये कमी वेळात थांबवण्यात आली आहे.

सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर उपनगरीय सेवा ठप्प झाली असून, मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या नोकरदार वर्गाला असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

गुजरातहून मुंबईच्या दिशेनं निघालेल्या मालगाडीचे डबे घरसल्यामुळं अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवरील वाहतुकीवर याचे परिणाम होताना दिसत आहेत.   

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार काही उपनगरीय सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, डाऊन मार्गावरही काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. काही रेल्वे निर्धारित वेळेहून उशिरा धावणार आहेत. 

पश्चिम रेल्वेकडून रद्द करण्यात आलेल्या रेल्वे खालीलप्रमाणं...  09024/ 09023 वलसाड- मुंबई सेंट्रल  09284/ 09285 डहाणू रोड- पनवेल- वसई रोड मेमू  09288/ 09287 वसई रोड- पनवेल- वसई रोड मेमू  09286/ 09281 वसई रोड- पनवेल- डहाणू रोड मेमू 

पालघर रेल्वे अपघातानंतर गाडी क्रमांक 22196 वांद्रे टर्मिनस - वीरांगना लक्ष्मीबाई झांसी जंक्शन ही ट्रेन 5 वाजून 10 मिनिटांऐवजी वांद्रे टर्मिनस येऊन 7 वाजून 10 मिनिटांनी सुटणार असून, ती निर्धारित स्थानकांवरही दिरंगाईनं पोहोचेल अशा सूचना रेल्वे विभागानं दिल्या आहेत. 

दरम्यान रेल्वे प्रवाशांना खोळंबा होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासन युद्धपातळीवर मालगाडीचे डबे रुळांवरून काढण्याचा प्रयत्न करत असून, येत्या काळात लवकरच रेल्वेसेवा सुरळीत करण्यावर भर दिला जात आहे.   हेही वाचा

मुंबई मेट्रो 3चा पहिला टप्पा जुलैपासून सुरू होण्याची शक्यता

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा