Advertisement

१५-१६ डिसेंबरला 'या' भागात कमी दाबानं पाणीपुरवठा

मुंबई आणि ठाणे परिसरात १५ व १६ डिसेंबर रोजी काही भागांत पाणीपुरवठा बंद तर काही भागांत कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे.

१५-१६ डिसेंबरला 'या' भागात कमी दाबानं पाणीपुरवठा
SHARES

मुंबई आणि ठाणे परिसरात १५ व १६ डिसेंबर रोजी काही भागांत  पाणीपुरवठा बंद तर काही भागांत कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे. मुंबई आणि ठाण्याच्या काही भागात दुरुस्तीची कामं हाती घेण्यात येणार आहेत. या कामांसाठी पाणीपुरवठा बंद तर कमी दाबानं होणार असल्याची माहिती दोन्ही महानगरपालिकांकडून देण्यात आली आहे.

महापालिकेद्वारे पत्रक काढून पाणीपुरवठ्याबाबत माहिती देण्यात आली आहे. वांद्रे विभागात दिनांक १५ आणि १६ डिसेंबर रोजी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे.

माहीम खाडी येथील पश्चिम रेल्वे पुलाखालून जाणाऱ्या तानसा पूर्वमुख्य जलवाहिनीवर कॅपिंगचे काम बुधवार १५ डिसेंबरला सकाळी १० वाजेपासून गुरुवार १६ डिसेंबर २०२१ रोजी रात्री १० वाजेदरम्यान हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळं यावेळात वांद्रे पश्चिम विभागाला कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या पिसे उदंचन केंद्रातील जॅकवेलमधील कचरा, गाळ काढण्यासाठी काही काळ पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच टेमघर शुध्दीकरण केंद्रामधील तसेच शहरातील विविध ठिकाणी तातडीने देखभाल आणि दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात येणार आहे.

त्यासाठी बुधवार १५ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते गुरुवार १६ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे. या शटडाऊनमुळं बुधवारी १५ डिसेंबर सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत ठाणे शहरातील इंदिरानगर, श्रीनगर, लोकमान्यनगर, रामनगर, डिफेन्स, किसननगर, घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, समतानगर, आकृती, सिध्देश्वर, जॉन्सन, ईटरनिटी, ब्रम्हांड, विजयनगरी, गायमुख, बाळकुम, कोलशेत, आझादनगर या भागात पाणी पुरवठा बंद राहील.

बुधवार रात्री ९ ते गुरुवार सकाळी ९ वाजेपर्यंत ऋतु पार्क, जेल, साकेत, रुस्तमजी, कळवा आणि मुंब्रा परिसरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळं पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा