Advertisement

LPG च्या दरात मोठी कपात, गॅस सिलेंडर झाले स्वस्त!


LPG च्या दरात मोठी कपात, गॅस सिलेंडर झाले स्वस्त!
SHARES

एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी एलपीजी सिलेंडरचे दर 198 रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे महागाईचा दर कमी होण्यास मदत होईल.

इंडियन ऑइलने 1 जुलै रोजी जाहीर केलेल्या किमतींनुसार, राजधानी दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर 198 रुपयांनी स्वस्त झाला आहे. 

दिल्लीत 30 जूनपर्यंत 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर 2219 रुपयांना मिळत होता. ज्याची किंमत 1 जुलैपासून 2021 रुपयांपर्यंत खाली आली आहे. त्याचप्रमाणे कोलकातामध्ये 2322 रुपयांच्या तुलनेत आता हा सिलिंडर 2140 रुपयांना मिळणार आहे.

मुंबईत 2171.50 रुपयांवरून 1981 रुपयांवर, तर चेन्नईमध्ये 2373 रुपयांवरून 2186 रुपयांपर्यंत किंमत कमी झाली आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरमध्ये तेल कंपन्यांकडून कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. दिल्लीत 14.2 किलोचा गॅस सिलिंडर 1003 रुपयांना मिळत आहे.

जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत प्रति सिलेंडर 200 रुपये सबसिडी जाहीर केली होती. ही सबसिडी वर्षाला फक्त 12 सिलिंडरपर्यंत उपलब्ध असेल. 

यापूर्वी 1 जून रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 135 रुपयांनी स्वस्त झाले होते. अशाप्रकारे गेल्या महिनाभरात सिलिंडरच्या दरात 300 रुपयांहून अधिक कपात झाली आहे. मे महिन्यात सिलिंडरचे दर 2354 रुपयांपर्यंत वाढले होते. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत अखेरचा बदल 19 मे रोजी करण्यात आला होता.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा