• अचानक कामावरून काढल्याने कर्मचारी नाराज
  • अचानक कामावरून काढल्याने कर्मचारी नाराज
SHARE

मुलुंड - टी वॉर्डमधील 60 सफाई कामगारांना कोणतीही सूचना न देता कामावरून काढून टाकण्यात आले आहे. टी वॉर्डने सफाई कामासाठी अत्याधुनिक अशी यंत्रसामुग्री विकत घेतली आहे. या पार्श्वभूमीवर टी वॉर्डमधून 60 कंत्राटी कामगारांना नारळ देण्यात आला आहे. या कामगारांना कोणतीही पूर्वकल्पना न देता रातोरात काढून टाकण्यात आलं आहे.

या प्रकारामुळे या कामगारांमध्ये संतापाचं वातावरण आहे. बडतर्फ केलेल्या सर्व कामगारांना पुन्हा कामावर रुजू करून घ्यावं असा अर्ज कामगारांनी महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत सपकाळे यांना गुरुवारी सुपूर्त केला आहे. तसेच पुन्हा कामावर रुजू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कामगारांकडून देण्यात आला आहे. यासंदर्भात टी वॉर्डकडून कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. एकता या स्वयंसेवी संस्थेमार्फत देखील या कामगारांची बाजू मांडण्यात येणार असल्याची माहिती या संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दिली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या