Advertisement

राज्यात ऑमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या १८ वर; नागपुरातही शिरकाव

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ऑमिक्रॉनचा जगभरात मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. अशातच आता या ऑमिक्रॉन विषाणूनं नागपूरमध्येही शिरकाव केला आहे.

राज्यात ऑमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या १८ वर; नागपुरातही शिरकाव
(Representational Image)
SHARES

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ऑमिक्रॉनचा जगभरात मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. अशातच आता या ऑमिक्रॉन विषाणूनं नागपूरमध्येही शिरकाव केला आहे. नागपूरसह चंडीगड, आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटकमध्ये रविवारी ओमायक्रॉनचा प्रत्येकी एक रुग्ण आढळला. 

नागपूरला आढळलेल्या रुग्णानं कोरोना प्रतिबंधक लशीची एकही मात्रा घेतलेली नाही. त्याला सौम्य लक्षणं असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं. या रुग्णाच्या संपर्कातील ३० जणांची करोना चाचणी करण्यात आली. त्यांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

आफ्रिकेतून ४ डिसेंबरला नागपुरात आलेल्या प्रवाशाला ऑमिक्रॉनची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. विमानतळावर चाचणी केली असता, त्याला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्याचे नुमने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आले होते. त्यात ऑमिक्रॉनची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळं आता राज्यातील ऑमिक्रॉन रुग्णसंख्या १८, तर देशाची ३८ वर पोहोचली आहे.

इटलीहून चंडीगडला आलेल्या २० वर्षीय प्रवाशासह आयर्लंडहून आंध्र प्रदेशमध्ये आलेल्या ३४ वर्षीय परदेशी नागरिकाला ऑमिक्रॉनची बाधा झाल्याचं आढळलं आहे. चंडीगडमध्ये आलेल्या प्रवाशानं दोन्ही लसमात्रा घेतलेल्या होत्या. त्याच्या संपर्कातील ७ जणांची चाचणी करण्यात आली. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक आहे.

दक्षिण आफ्रिकेतून कर्नाटकमध्ये आलेल्या प्रवाशाला ऑमिक्रॉनची लागण झाल्याचं आढळलं आहे. ऑमिक्रॉनचा हा तेथील तिसरा रुग्ण आहे. ब्रिटनमधून केरळमध्ये आलेल्या एका नागरिकालाही या विषाणूची लागण झाली आहे. त्याची पत्नी आणि आईलाही करोनाची लागण झाली असून, त्यांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आले आहेत.  

महाराष्ट्रात ऑमिक्रॉनचे सर्वाधिक १८ रुग्ण आहेत. राज्यात शुक्रवारी ऑमिक्रॉनचे ७ रुग्ण आढळले होते. राज्यात या विषाणूचा पहिला रुग्ण डोंबिवलीत आढळला होता.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा