Advertisement

मुंबईकरांसाठी आता "सरस" संधी


मुंबईकरांसाठी आता "सरस" संधी
SHARES

ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्यता गटांनी तयार केलेल्या वस्तू, उत्पादने, साहित्य, नावीन्यपूर्ण कला आणि खाद्यपदार्थ यांची चव चाखण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. मुंबईत महालक्ष्मी सरस प्रदर्शन भरवलं जाणार आहे. महालक्ष्मी सरस म्हणजे राज्यातील बचतगटांच्या उत्पादनांना मुंबईत हक्काची बाजारपेठ आणि प्रदर्शनाची संधी आहे.

महाराष्ट्रातील स्वयंसहाय्यता गटाबरोबरच जवळपास २८ राज्यांमधून विविध उत्पादने, कला घेऊन स्वयंसहाय्यता गट या प्रदर्शनीत सहभागी होणार आहेत. एकूण ५११ स्टॉल्स उपलब्ध असणार असून त्यापैकी खाद्यपदार्थांचे ७० स्टॉल असणार आहेत. यातील ३११ स्टॉल्स राज्याच्या विविध जिल्ह्यांतील आहेत, तर २०० स्टॉल्स बाहेरच्या राज्यातील आहेत. यावर्षी स्वयंसहाय्यता गटांना ऑनलाईन पद्धतीने स्टॉल वाटप करण्यात आलं असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.


प्रदर्शन कुठे आणि केव्हा?

हे प्रदर्शन मुंबईत एमएमआरडीए मैदान, प्लॉट क्रमांक १९ ते २२, वांद्रे - कुर्ला संकुल, येथे १७ जानेवारी ते २९ जानेवारी २०१८ या कालावधीत नागरीकांसाठी सकाळी १० ते रात्री १० पर्यंत खुले राहणार असून प्रवेश विनामूल्य असेल.


प्रदर्शनात काय असेल?

भारतातील विविध संस्कृती आणि स्वादिष्ट भोजन येथे उपलब्ध असेल. यामध्ये ग्रामीण महिला आणि कारागीरांनी तयार केलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तू, अस्सल ग्रामीण भागातील खाद्यपदार्थ या प्रदर्शनात उपलब्ध होणार आहे. याचसोबत दररोज संध्याकाळी ग्रामीण भागातील विविध लोककलांचे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा