Advertisement

राज्यात रात्रीचे जमावबंदीचे आदेश लागू, काय आहेत इतर निर्बंध?

राज्यात ओमिक्रॉनचा धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रात्रीचे जमावबंदीचे आदेश लागू, काय आहेत इतर निर्बंध?
SHARES

राज्यात ओमिक्रॉनचा धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी नव्या नियमावलीची घोषणा केली आहे.

त्यानुसार आज रात्रीपासून राज्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ही जमावबंदी असणार आहे.

२४ डिसेंबर २०२१ रोजी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या स्वाक्षरीनं काढण्यात आलेल्या आदेशात खालीलप्रमाणे अतिरिक्त निर्बंध असतील.

  • संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत बंदी असेल.
  • लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल. तर खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के कमी असेल.
  • इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या १००च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५०च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.
  • क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
  • वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असं करताना २७ नोव्हेंबर २०२१ चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असं बघितलं जाईल.
  • उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.

गुरुवारी यासंदर्भात मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. दरम्यान आजपासूनच राज्यात निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.

जानेवारीत तिसरी लाट येऊ शकते, असं मलिक यांनी म्हटलं आहे. हायकोर्टानं सांगितलं आहे की, तिसरी लाट येऊ शकते त्यामुळे निवडणूक पुढे ढकलायली हवी. जर निवडणूका झाल्या नाहीत तर राष्ट्रपती राजवट लावावी लागेल. पंजाबमध्ये अशी परिस्थिती होऊ शकते, असंही मलिक म्हणाले.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा