Advertisement

SRA च्या इमारतींमधील अग्निसुरक्षा यंत्रणेची होणार तपासणी

गोरेगाव आगीच्या दुर्घटनेनंतर सरकारला जाग आली आहे.

SRA च्या इमारतींमधील अग्निसुरक्षा यंत्रणेची होणार तपासणी
SHARES

एसआरए इमारतींमधील अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार मुंबईच्या अग्निशमन दलाने या आठवड्यापासून अग्निसुरक्षा तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत एसआरएच्या चार ते पाच हजार इमारती आहेत.

एसआरए इमारत पूर्ण होऊन त्याला ओसी मिळाल्यानंतर त्या इमारतीची पहिली तीन वर्षे संपूर्ण जबाबदारी ही एसआरए आणि विकासकाची असते. त्यानंतर देखभाल, दुरुस्ती आणि सुरक्षेची जबाबदारी ही संबंधित सोसायटीची जबाबदारी असते. त्यानंतरही अनेक सोसायट्या अग्निसुरक्षा यंत्रणा बसवण्याकडे दुर्लक्ष करतात.

गोरेगावमधील आग लागलेल्या इमारतीत कोणतीही अग्निसुरक्षा यंत्रणा नव्हती. या घटनेनंतर शिंदे यांनी मुंबईतील एसआरए इमारतींमधील अग्निसुरक्षा यंत्रणांची तपासणी करण्याच्या सूचना संबंधित विभागांना केल्या.

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर एसआरए इमारतींची सुरक्षा तपासणी करण्याच्या सूचना अग्निशमन दलाला केल्याचे मुंबई महापालिकेचे सह आयुक्त रमेश पवार (सुधार) यांनी सांगितले. त्यानुसार येत्या आठवड्यात अग्निशमन दलाकडून तपासणीला सुरुवात करण्यात येणार आहे.

दोन ते तीन दिवसांत तीन ते चार इमारती तपासण्याचे नियोजन आहे. मात्र यावर अंतिम निर्णय होणार आहे. इलेक्ट्रिक वायर, अग्निरोधक यंत्रणा कार्यरत आहेत की नाही आदींची तपासणी करण्यात येईल. त्यात त्रुटी असल्यास अग्निरोधक यंत्रणा बसविणे किंवा त्या कार्यरत करण्यासाठी साधारण एक महिन्याची मुदतही देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

गोरेगाव पश्चिमेकडील जय भवानी या सात मजली एसआरए इमारतीला भीषण आग लागून रहिवाशांनी जीव गमावल्यानंतर राज्य सरकारला खडबडून जाग आली आहे. या दुर्घटनेनंतर एसआरए इमारतींमधील अग्निसुरक्षा यंत्रणेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.



हेही वाचा

शहाड ते टिटवाळा स्थानकांमधील २० टक्के नूतनीकरणाचे काम पूर्ण

स्विमिंग पूलमध्ये मगरीचे पिल्लू प्राणीसंग्रहालयातूनच घुसल्याचा दावा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा