Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं नागरिकांना मास्क घालण्याचं आवाहन, नाहीतर पुन्हा...

राज्यातील वाढत्या कोविड-19 रुग्णांमध्ये होणारी वाढ पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे आवाहन केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं नागरिकांना मास्क घालण्याचं आवाहन, नाहीतर पुन्हा...
(File Image)
SHARES

कोरोना रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून राज्यातील जनतेने मास्क वापरत रहावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून जनतेला केले आहे.

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत कोविड रुग्णसंख्या वाढते आहे याबाबत आढावा घेऊन चर्चा झाली.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, आज कॅबिनेटमध्ये जे मुद्दे होते त्या सर्वांवर चर्चा झाली. कोविडचे रुग्ण वाढले त्यावर चर्चा झाली. संख्या वाढली तर येत्या काळात निर्बध येण्याची शक्यता आहे. लोकांनी काळजी घेतली पाहिजे. अशीच रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा निर्बंधांची वेळ येईल.

मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, काल (25 मे 2022) मुंबईत 295 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. तर 194 रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर 98 टक्के इतका आहे. आतापर्यंत मुंबईतील 1042474 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

सध्यस्थितीत मुंबईत एकूण 1531 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण दुप्पटीचा दर 3973 दिवस इतका आहे. तर कोरोना बाधित रुग्णवाढीचा दर (18 मे - 24 मे) या कालावधीत - 0.017 टक्के इतका आहे.

राज्यातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.59 टक्के असून मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी आढळते. मुंबईत रुग्णसंख्येत 52.79 टक्के वाढ झाली आहे. ठाण्यामध्ये 27.92 टक्के तर रायगड आणि पालघर जिल्ह्यात 18.52 टक्के आणि 68.75 टक्के वाढ झाली आहे.हेही वाचा

पालिका मुंबईतील 'ही' ३ कोविड सेंटर करणार बंद

मंकीपॉक्ससाठी पालिकेची तयारी, रुग्णांसाठी उभारला स्वतंत्र वॉर्ड

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा