Advertisement

पोलीस उपनिरीक्षकांना मूलभूत प्रशिक्षणासाठी पाठवणार

हे प्रशिक्षण कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या कोरोना मार्गदर्शक तत्वांच्या अधीन राहून सुरू करण्यात येईल, असं मंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

पोलीस उपनिरीक्षकांना मूलभूत प्रशिक्षणासाठी पाठवणार
SHARES

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक सरळसेवा परीक्षा-२०१८ आणि खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा २०१७ मधील पात्र एकूण ७३७ उमेदवारांना जून-२०२१ पासून नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमी इथं मूलभूत प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

सदरचं प्रशिक्षण हे कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या कोरोना मार्गदर्शक तत्वांच्या अधीन राहून सुरू करण्यात येईल, असं मंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

२१ जूनपासून सुरू 

खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा २०१७ मधील ३२२ उमेदवारांचं प्रशिक्षण सत्र २१ जूनपासून सुरु करण्याचं प्रस्तावित करण्यात आलं आहे. तसंच पोलीस उपनिरीक्षक सरळसेवा परीक्षा २०१८ मधील एकूण ३८७ उमेदवार तसंच २०१७ च्या प्रतीक्षा यादीतील २२ उमेदवार व सत्र क्रमांक ११८ मधील मुदतवाढ मिळालेले ६ उमेदवार अशा एकूण ४१५ उमेदवारांचं मूलभूत प्रशिक्षण २४ जूनपासून सुरु करण्याचं गृह विभागाने प्रस्तावित केलं आहे.

हेही वाचा- राज्य सरकारचं मिशन ऑक्सिजन!, ३ हजार मेट्रिक टन उत्पादनाचं उद्दिष्ट

अट शिथिल

दरम्यान, राज्य राखीव पोलीस बलातून राज्य पोलीस दलात बदलीकरिता आवश्यक सेवेची १५ वर्षाची अट शिथिल करुन १२ वर्ष करण्याचा तसंच प्रतिनियुक्तीच्या अटी शर्तीमध्ये बदल करण्याचा निर्णय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत  झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

राज्य राखीव पोलीस बलातून राज्य (जिल्हा) पोलीस दलात पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदलीकरिता १५ वर्ष सेवेची अट कमी करण्याबाबत तसेच राज्य राखीव पोलीस बलातील पोलीस कर्मचारी यांच्या सेवाशर्ती अधिक चांगल्याप्रकारे कशा करता येतील यासंदर्भात पोलीस महासंचालक व अपर पोलीस महासंचालक (राज्य राखीव पोलीस बल) यांची एक समिती गठीत करण्यात आली होती.

(maharashtra government home department allowed new selected psi for training)

हेही वाचा- देशात सापडला कोरोनाचा नवा ‘AP स्ट्रेन’; आधीच्या स्ट्रेनपेक्षा १५ टक्के जास्त भयंकर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा