Advertisement

राज्य सरकारचं मिशन ऑक्सिजन!, ३ हजार मेट्रिक टन उत्पादनाचं उद्दिष्ट

राज्यात आॅक्सिजन टंचाईवर मात करण्यासाठी राज्य सरकारने स्वावलंबनाचं धोरण स्वीकारलं आहे. या अंतर्गत अधिकाधिक आॅक्सिजन राज्यातच उत्पादीत करण्यावर भर देण्यात येणार आहे.

राज्य सरकारचं मिशन ऑक्सिजन!, ३ हजार मेट्रिक टन उत्पादनाचं उद्दिष्ट
SHARES

राज्यात आॅक्सिजन टंचाईवर मात करण्यासाठी राज्य सरकारने स्वावलंबनाचं धोरण स्वीकारलं आहे. या अंतर्गत अधिकाधिक आॅक्सिजन राज्यातच उत्पादीत करण्यावर भर देण्यात येणार आहे.

त्यानुसार राज्यात ३ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. महाराष्ट्र मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहन मंजूर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 

सद्यस्थितीत महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश कोरोना-१९ महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करीत आहे. त्यातच आगामी ४-५ महिन्यात कोरोना-१९ विषाणू (coronavirus) प्रादुर्भावाची तिसरी लाट येणार असल्याचं मत तज्‍ज्ञांनी व्यक्त केलं आहे. वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात प्राणवायूचा (Liquid Medical Oxygen) (LMO) तुटवडा निर्माण झाला आहे. राज्याची प्राणवायू निर्मितीची क्षमता सद्य:स्थितीत १३०० मे.टन/प्रतिदिन असताना १८०० मे.टन एवढ्या प्राणवायूची मागणी आहे. कोरोना-१९ प्रादुर्भावाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे ही मागणी २३०० मे.टन इतकी वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- २०० मेट्रीक टन वाढीव आॅक्सिजनसह टँकर्सही द्या, महाराष्ट्राची केंद्राकडे मागणी

याकरिता राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या अनुषंगाने तातडीने ऑक्सिजन निर्मिती व साठा वाढविणे, क्रिटीकल गॅप शोधून कार्यवाही करणं, लॉजिस्टीक ट्रान्सपोर्टवर उपाययोजना करणं, इत्यादी उपाययोजना करुन राज्य ऑक्सिजन निर्मिती क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी व आवश्यक ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्याकरीता, महाराष्ट्रात (maharashtra“मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहने मंजूर करण्याचा व याअनुषंगाने इतर उपाययोजना राज्यामध्ये निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्यात सध्या १२५० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादित असून तो पूर्णपणे वैद्यकीय कारणासाठी वापरला जातो. आॅसिजनची मागणी  भरून काढण्यासाठी अन्य राज्यांमधून ऑक्सिजन आणतानाच स्थानिक पातळीवरच ऑक्सिजन निर्मिती व्हावी यासाठी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या तंत्रज्ञानाच्या आधारावर प्लांट सुरू करण्याचे निर्देश राज्य शासनाने नुकतेच दिले आहेत.

ऑक्सिजनच्या बाबतीत राज्य स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत १५० पीएसए प्लांटसाठी ऑर्डर देण्यात आली आहे. राज्यात अशा प्रकारे ३५० प्लांट बसविण्याचे नियोजन असून त्याद्वारे ५०० मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे.

(maharashtra government targets to produce 3 thousand metric ton oxygen in a state)

हेही वाचा- देशात सापडला कोरोनाचा नवा ‘AP स्ट्रेन’; आधीच्या स्ट्रेनपेक्षा १५ टक्के जास्त भयंकर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा