Advertisement

गेटवे ऑफ इंडियाचे होणार सुशोभिकरण

गेट वे ऑफ इंडियाचं आता सुशोभिकरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गुरुवारी बैठकी घेतली होती.

गेटवे ऑफ इंडियाचे होणार सुशोभिकरण
SHARES

मुंबईत पर्यटनासाठी आल्यावर पर्यटकांसह सर्व नागरिकांच्या नजरा वळतात त्या गेट वे ऑफ इंडियाकडे. जगातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून आलेला पर्यटक या गेटसमोर फोटो काढून आपल्यासोबत आठवण घेऊन जातो. दरम्यान, याच गेट वे ऑफ इंडियाचं आता सुशोभिकरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गुरुवारी बैठकी घेतली होती. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला होता.


गेट वे ऑफ इंडियाचे रुपडे पालटणार

गेट वे ऑफ इंडियाच्या सुशोभिकरणासाठी राज्यपालांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता आणि वास्तुकारांना एक महिन्यात निविदा काढण्याचे आदेश दिले आहेत. तसंच, या गेट वे ऑफ इंडियाला हेरिटेजचा दर्जा आहे. त्यामुळे सुशोभिकरणावेळी कोणत्याही प्रकारच्या बांधकामाला कुठलाही धोका न पोहोचवता हे काम करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.


गेट वे ऑफ इंडियाचा इतिहास

इंग्लंडचा राजा पाचवा जॉर्ज यांच्या १९११ सालच्या ऐतिहासिक भेटीसाठी हे प्रवेशद्वार उभारण्यात आले होते. जॉर्ज यांच्या स्वागतासाठी त्यावेळच्या अपोलो बंदराच्या पायथ्याशी मोगलाई थाटाचा तात्पुरता मंडप उभारण्यात आला होता. जॉर्ज विट्टे या वास्तुविशारदाच्या कल्पनेतून साकार झालेली ती वास्तू म्हणजेच गेट वे ऑफ इंडिया. त्यानंतर ४ डिसेंबर १९२४ साली हा गेट लोकांसाठी खुला करण्यात आला होता.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा