Advertisement

ration shops: मुंबई, ठाण्यात २९ रेशन दुकानदारांवर कारवाई

मुंबई, ठाणे परिसरात सरकारकडून मिळणाऱ्या शिधावाटपात गैरप्रकार करणाऱ्या २९ रेशन दुकानदारांवर दक्षता पथकाने कारवाई केल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व मुंबईचे नागरी पुरवठा संचालक कैलास पगारे यांनी दिली.

ration shops: मुंबई, ठाण्यात २९ रेशन दुकानदारांवर कारवाई
SHARES

मुंबई, ठाणे परिसरात सरकारकडून मिळणाऱ्या शिधावाटपात गैरप्रकार करणाऱ्या २९ रेशन दुकानदारांवर दक्षता पथकाने कारवाई केल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व मुंबईचे नागरी पुरवठा संचालक कैलास पगारे (maharashtra government take action against 29 ration shop for corruption in food grain distribution ) यांनी दिली.

मुंबई, ठाणे शिधावाटप क्षेत्रातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना (NFSA), प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आत्मनिर्भर भारत योजना तसंच राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या एपीएल शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य तसंच गॅस सिलिंडर व पेट्रोल-डिझेलचा पुरवठा व वितरण यामध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी प्रधान कार्यालय तसंच परिमंडळ कार्यालय व परिमंडळ कार्यालय अधिनस्त शिधावाटप कार्यालयांतर्गत एकूण ४४ दक्षता पथके नेमण्यात आलेली आहेत. या दक्षता पथकामार्फत लॉकडाऊनच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत आतापर्यंत खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.

  • एकूण १३ अधिकृत शिधावाटप दुकानांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. 
  • एकूण ४ अधिकृत शिधावाटप दुकाने रद्द करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे.
  • एकूण १२ अधिकृत शिधावाटप दुकानांवर जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

हेही वाचा - केशरी रेशन कार्डधारकांना आणखी २ महिने मोफत धान्य

प्रधान कार्यालयाच्या फिरत्या पथकामार्फत ३ ठिकाणी धाडी टाकून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करुन जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

अ) दिनांक ४ एप्रिल २०२० रोजी अधिकृत शिधावाटप दुकान क्र.४१-फ-२१८ येथे १२०० कि.ग्रॅ. अतिरिक्त गहू, जप्त मुद्देमालाची किंमत रुपये ३०,०७२/-, गुन्हा नोंद क्र.२३३/२०२०, नयानगर पोलीस ठाणे, जि.ठाणे.

ब) दिनांक ६ जून २०२० रोजी अधिकृत शिधावाटप दुकान क्र.३३-ई-१४३ येथे टेम्पो क्र.एम.एच.-०३-सी.पी.-३३९७, तांदूळ २७८३ कि.ग्रॅ. व गहू ४४६ कि.ग्रॅ. अतिरिक्त, जप्त मुद्देमालाची किंमत रुपये ४,६१,४२०/-, गुन्हा नोंद क्र.१६७/२०२०, टिळकनगर पोलीस ठाणे, मुंबई.

क) दिनांक ९ जून २०२० रोजी तुर्भे येथे पेट्रोल/डिझेल टँकर क्र.एम.एच.-०६-बी.डी.-३७७७ मधून अवैधरित्या डिझेल चोरी प्रकरणी जप्त मुद्देमालाची किंमत रुपये ३३,१५,६९२/-, गुन्हा नोंद क्र.२०३/२०२०, तुर्भे एम.आय.डी.सी.पोलीस ठाणे, नवी मुंबई.

हेही वाचा - राज्यात ४८३ रेशन दुकाने निलंबित तर ३२२ दुकानांचे परवाने रद्द –छगन भुजबळ

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा