Advertisement

माथेरानचे सौंदर्य पहा व्हिस्टाडोम कोचमधून, डोंगर-दऱ्यांमधून धावणार ‘ब्लॅक ब्युटी’

जुन्या धूर सोडणाऱ्या अगिनगाड्या नव्या रुपात पुन्हा धावण्याची शक्यता आहे.

माथेरानचे सौंदर्य पहा व्हिस्टाडोम कोचमधून, डोंगर-दऱ्यांमधून धावणार ‘ब्लॅक ब्युटी’
SHARES

मुंबईकरांना लवकरच माथेरान हिल स्टेशनवर विस्टाडोम डब्यांसह विंटेज सौंदर्य असलेल्या ब्लॅक ब्युटी रेल्वे गाड्यांचा अनुभव घेता येणार आहे. जुन्या धूर सोडणाऱ्या अगिनगाड्या नव्या रुपात पुन्हा धावण्याची शक्यता आहे. 

भारतीय रेल्वे माथेरान हिल स्टेशनवर 'ब्लॅक ब्युटी' नावाने ओळखले जाणारे जुने वाफेचे इंजिन नव्या स्वरूपात सादर करण्याचा विचार करत आहे. माथेरान हिल रेल्वे, कांगडा रेल्वे, बिलमोरा वाघाई, महू पाताळपाणी आणि मारवाड देवगड माद्रिया कालका-शिमला रेल्वे, दार्जिलिंग हिल्स, निलगिरी माउंटन रेल्वे या इतर हेरिटेज रेल्वे मार्ग आहेत जिथे “ब्लॅक ब्युटी” पुन्हा धावण्याची शक्यता आहे.

फ्रि प्रेस जनरलने केलेल्या वृत्तानुसार, या हेरिटेज क्षेत्रातील गाड्या आता पारंपारिक कोळसा आणि डिझेल लोकोच्या जागी इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन इंधन प्रोपल्शन इंजिनद्वारे धावतील.

इलेक्ट्रिक आणि हायड्रोजनवर चालणारी इंजिने जुन्या स्टीम-स्पीइंग लोकोमोटिव्हचे रूप घेतील. या गाड्यांमध्ये विस्टाडोम कोच असतील जेथून प्रवासी या प्रदेशातील नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेऊ शकतील.

याला दुजोरा देताना एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय रेल्वेने ‘बॅक ब्युटी’ परत आणण्यासाठी काम सुरू केले आहे.

"तमिळनाडूतील रेल्वेच्या गोल्डन रॉक्स वर्कशॉपमध्ये अशा प्रकारच्या वाफेच्या इंजिनांचे प्रोटोटाइप मॉडेल तयार केले जात आहेत. अजमेर वर्कशॉपमध्येही अशा सुविधा पुरवल्या जाऊ शकतात. या प्रस्तावित हेरिटेज गाड्यांचे डबे हायड्रोजन प्रोपल्शन मेकॅनिझमसह रेट्रो-फिट केले जातील," असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे या गाड्या पर्यटनाला चालना देण्यासाठी सुरू केल्या जाऊ शकतात.



हेही वाचा

रुळांजवळील खांबांची धडक बसून ७५ प्रवाशांचा अपघात

पश्चिम रेल्वेवर आठवी वातानुकूलित लोकल धावणार, चाचणी सुरू

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा