Advertisement

रुळांजवळील खांबांची धडक बसून ७५ प्रवाशांचा अपघात

कल्याण, सीएसएमटी, वाशी, वांद्रे, चर्चगेट या स्थानकांवर सर्वाधिक अपघातांची नोंद झाली आहे

रुळांजवळील खांबांची धडक बसून ७५ प्रवाशांचा अपघात
SHARES

लोकल किंवा एक्स्प्रेस गाड्यांच्या दरवाजाजवळ उभे राहून प्रवास करणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये रेल्वेतून प्रवास करताना दरवाजाजवळ उभे राहिलेल्या ७५ प्रवाशांना रुळांजवळील खांबाची धडक बसून अपघात झाला आहे. यापैकी २० प्रवाशांना प्राणास मुकावे लागले आहे.

दरवाजाजवळ लटकून प्रवास करताना दुर्लक्ष झाल्याने रुळांजवळील खांबाला धडक बसून प्रवाशांचा अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातच लोकल गाड्यांना गर्दी नसतानाही काही प्रवासी दरवाजाजवळ उभे राहून स्टंट करीत असतात. त्यामुळेही अपघात होतात. मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या दरवाजाजवळ काही प्रवासी विनाकारण उभे राहून प्रवास करतात आणि त्यामुळेही अपघात होतात.

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२०, २०२१ आणि २०२२ मध्ये एकूण ७५ प्रवाशांचे अपघात झाले आहेत. तीन वर्षांत या अपघातांमध्ये वाढ झाली आहे. यापैकी २० प्रवाशांचा मृत्यू आणि ५५ प्रवाशी जखमी झाले आहेत. एकूण ७५ अपघातांपैकी मध्य रेल्वे मुंबई विभागात सर्वाधिक ४७ अपघात झाले आहेत.

तसेच मध्य रेल्वेवर अशा अपघातांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. कल्याण, सीएसएमटी, वाशी, वांद्रे, चर्चगेट लोहमार्ग पोलीस ठाण्यात सर्वाधिक अपघाताची नोंद झाली आहे.

लोकलच्या टपावर चढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा पेन्टाग्राफ आणि ओव्हरहेड वायरमुळे शाॅक लागून मृत्यू होत आहे किंवा ते जखमी होत आहेत. असा प्रवास करणाऱ्या २० प्रवाशांचा २०२०, २०२१ आणि २०२२ मध्ये मृत्यू झाला असून २९ जण जखमी झाले आहेत.



हेही वाचा

मुंबईला लवकरच देशातील पहिली पूर्ण-वेस्टिब्युल एसी लोकल ट्रेन मिळणार

पश्चिम रेल्वेवर आठवी वातानुकूलित लोकल धावणार, चाचणी सुरू

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा