Advertisement

मुंबईला लवकरच देशातील पहिली पूर्ण-वेस्टिब्युल एसी लोकल ट्रेन मिळणार

वेस्टिब्युल लोकल म्हणजे रेल्वेच्या डब्यांमध्ये पार्टिशन नसेल. जसे लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये एका कोचमधून दुसऱ्या कोचमध्ये जाता येते, त्याचप्रकारे लोकल ट्रेनमध्ये वेस्टिब्युल कोच असतील.

मुंबईला लवकरच देशातील पहिली पूर्ण-वेस्टिब्युल एसी लोकल ट्रेन मिळणार
SHARES

पश्चिम रेल्वे उपनगरीय सेवांसाठी पूर्णपणे वेस्टिब्युल लोकल सुरू करण्याचा विचार करत आहे. हा फ्लीट वातानुकूलित असेल आणि अंडरस्लंग मोटर्स आणि इलेक्ट्रिक सिस्टमद्वारे चालविला जाईल. वृत्तानुसार, रेल्वे बोर्डाने झोनल अधिकाऱ्यांना पूर्ण-वेस्टिब्युल गाड्यांचा वापर सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

वेस्टिब्युल लोकल म्हणजे रेल्वेच्या डब्यांमध्ये पार्टिशन नसेल. जसे लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये एका कोचमधून दुसऱ्या कोचमध्ये जाता येते, त्याचप्रकारे लोकल ट्रेनमधून वेस्टिब्युल कोच असतील.  

पहिल्या टप्प्यात पश्चिम रेल्वे मुंबई सेंट्रल डेपोमध्ये जवळपास तयार अवस्थेत पडून असलेल्या ट्रेनचा वापर करणार आहे. याशिवाय, आणखी आठ पूर्ण-वेस्टिब्युल गाड्याही एका वर्षात उपनगरीय नेटवर्कमध्ये जोडल्या जातील.

एकदा कार्यान्वित झाल्यानंतर, ही देशातील पहिली पूर्णपणे वेस्टिब्युल लोकल ट्रेन असेल. WR भविष्यात अधिक पूर्ण-वेस्टिब्युल ट्रेनच्या शक्यतांचा शोध घेईल.

पूर्ण-वेस्टिब्युल गाड्या एकमेकांशी जोडलेल्या असतात आणि प्रवासी ट्रेनमधून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊ शकतात. या प्रकारच्या गाड्या नियमित गाड्यांपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेऊ शकतात. सामान्यतः, स्थानकांवर प्रवाशांना प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी वेस्टिब्युल गाड्यांना दोन्ही बाजूला दरवाजे असतात.

मुंबईत सध्या मध्य रेल्वेच्या सहा आणि पश्चिम रेल्वेच्या सात अशा एकूण १३ एसी लोकल धावत आहेत. सध्याच्या एसी लोकल ट्रेन्समध्ये एंड-टू-एंड अंतर्गत कनेक्शन नसते.

अलीकडेच, पश्चिम रेल्वेने 26 लोकल ट्रेन सेवा 12 डब्यांमधून 15 डब्यांमध्ये बदलण्याचा निर्णय घेतला. यामुळे उपनगरीय विभागातील WR च्या प्रवासी वहन क्षमतेत लक्षणीय सुधारणा झाली. या 26 लोकल ट्रेनपैकी 10 जलद मार्गावर धावतात.

गेल्या आठवड्यात WR अधिकाऱ्यांनी सांगितले की, पश्चिम रेल्वेची सहावी लाईन लवकरच बोरिवली आणि मुंबई सेंट्रल दरम्यान येईल. नवीन लाईनचे बांधकाम दोन टप्प्यात केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात, खार-गोरेगाव ट्रॅकचा पहिला भाग मार्च 2023 पर्यंत खुला होणे अपेक्षित आहे, असे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा यांनी सांगितले.



हेही वाचा

पश्चिम रेल्वेवर आठवी वातानुकूलित लोकल धावणार, चाचणी सुरू

आता शिर्डीला रात्रीही विमानाने जाता येईल, मार्चपासून नवीन टर्मिनल होणार सुरू

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा