Advertisement

राज्यातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढण्याची शक्यता, मुख्यमंत्री जाहीर करणार निर्णय

लॉकडाऊन वाढवण्याच्या निर्णयावर मंत्रीमंडळाच्या बैठकित एकमत झालं. पण हा निर्णय मुख्यमंंत्री लवकरच जाहीर करतील.

राज्यातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढण्याची शक्यता, मुख्यमंत्री जाहीर करणार निर्णय
SHARES

राज्यातील लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) पुन्हा एकदा वाढवण्याच्या निर्णयावर मंत्रीमंडळाच्या बैठकित एकमत झालं. पण हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असं  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.  

सध्या ‘ब्रेक द चेन’ (Break the chain) अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध हे १५ मे पर्यंत कायम होते. त्यानंतर आता हे निर्बंध वाढवून ३१ मे पर्यंत कायम ठेवण्याचं बैठकित ठरवण्यात आलं आहे. पण हा निर्णय अद्याप जाहीर केला नाही. 

मंत्रिमंडळ बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन वाढवण्याच्या संदर्भातील माहिती दिली आहे. राजेश टोपेंनी पुढे म्हटलं, लॉकडाऊनमुळे रुग्ण वाढीचं प्रमाण घटलं आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याच्या निर्णयावर आमचं एकमत झालं. पण हा निर्णय मुख्यमंंत्री जाहीर करतील.

४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करणं महत्वाचं आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण तूर्तास स्थगित करण्यात आलं आहे. दुसरा डोस आधी पूर्ण करावा लागणार आहे. सिरमकडून २० तारखेनंतर 2 कोटी लस देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. लसींचा पुरवठा होताच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरू होईल.

लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात यावा अशी सर्वांनीच मागणी केली. त्यानंतर लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्यानंतर ब्रेक द चेन अंतर्गत लागू असलेले कठोर निर्बंध या कालावधीत सुद्धा लागू असणार आहेत.

लॉकडाऊन लागू केल्यानं मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या शहरांत कोरोना रुग्ण वाढीला ब्रेक लागला. रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील इतर भागांतील कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी हे कठोर निर्बंध आणखी १५ दिवस लागू करण्यात यावे यावर बैठकित एकमत झालं. 



हेही वाचा

म्युकोरमायकोसिसनं मृत्यू होण्याचं प्रमाण ५० टक्के : राजेश टोपे

मुंबईकरांनो... पाणी जपून वापरा, पालिकेकडून १० टक्के पाणीकपात

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा