Advertisement

म्युकोरमायकोसिसनं मृत्यू होण्याचं प्रमाण ५० टक्के : राजेश टोपे

ब्लॅक फंगसमुळे होणारे मृत्यूचे प्रमाण ५० टक्के आहे.

म्युकोरमायकोसिसनं मृत्यू होण्याचं प्रमाण ५० टक्के : राजेश टोपे
SHARES

कोरोनाव्हायरसनं बरे झालेल्या रूग्णांना आता 'ब्लॅक फंगस' (Black Fungus) हा संसर्ग होण्याचा धोका उद्भवला आहे. राज्य सरकार वैद्यकीय महाविद्यालया(Medical Collage)शी संलग्न रुग्णालयांना म्युकोरमायकोसिसचे (Mucormycosis) उपचार केंद्र म्हणून वापरणार आहे. 

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Maharashta Health Minister Rajesh Tope) यांनी मंगळवारी ११ मे रोजी हे जाहीर केलं. हा निर्णय म्युकोरमायकोसिसच्या रूग्णांवर उपचार करता यावा म्हणून घेण्यात आला आहे.

पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले की, राज्यात २,००० हून अधिक म्युकोरमायकोसिस रुग्ण आढळू शकतात. कोविड -१९ चे अधिक रुग्ण आढळल्यास त्यांची संख्या निश्चितच वाढेल.

ते म्हणाले की, ब्लॅक फंगस(Black Fungus)मुळे होणारे मृत्यूचे प्रमाण ५० टक्के आहे. मुख्यतः कोरोनव्हायरस रूग्णांमध्ये कमी झालेली प्रतिकारशक्ती किंवा इतर आजार असलेल्या रुग्णांना याचा जास्त धोका संभावतो.

मंत्री म्हणाले, "ब्लॅक फंगसच्या रुग्णांना ईएनटी, नेत्ररोग तज्ञ आणि न्यूरोलॉजिस्ट अशा अनेक तज्ज्ञांद्वारे पाहण्याची गरज आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत (राज्यातील प्रमुख आरोग्य आरोग्य योजना) उपचार करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत."

महागड्या उपचाराबद्दल टिप्पणी देताना ते म्हणाले, "मी नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटीला लिहिणार आहे की, म्युकोमार्कसिस उपचारांसाठी आवश्यक असलेल्या औषधांचे दर कमी करावेत."

म्फोटेरिसिन-बी हे अशा रुग्णांच्या उपचारांसाठी आवश्यक असलेले एक औषध आहे. टोपे यांनी सांगितले की, हाफकीन (मुंबईतील सरकारी फर्म कंपनी) औषधाच्या एक लाख इंजेक्शनसाठी निविदा आणणार आहे.

काळ्या बुरशीचे हा आजार झालेल्या रुग्णांमध्ये डोकेदुखी, ताप, डोळ्यांखाली वेदना, सायनस आणि दृष्टी कमी होणे आदी लक्षणं दिसून येतात.



हेही वाचा

म्युकोरमायकोसिसचा वाढता धोेका, हाफकिनला १ लाख इंजेक्शनची ऑर्डर

ठाण्यात आढळला म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा