Advertisement

विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात आठवड्यातून एकदा अंडी आणि केळी मिळणार

शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला

विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात आठवड्यातून एकदा अंडी आणि केळी मिळणार
SHARES

शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शासकीय व शासकीय अनुदानित शाळांमधील इयत्ता 1 ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेद्वारे सकस व पौष्टिक आहार देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार नियमित आहाराव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडी आणि अंडी न खाणाऱ्यांना केळी दिली जाणार आहे. ही मोहीम 23 आठवडे सुरू राहणार  

निर्णयानुसार शालेय विद्यार्थ्यांना बुधवार किंवा शुक्रवारी उकडलेले अंडे किंवा अंड्याचा पुलाव, बिर्याणी या स्वरूपात जेवण दिले जाणार आहे. जे विद्यार्थी अंडी खात नाहीत त्यांना केळी किंवा अपवादात्मक परिस्थितीत अंड्यांऐवजी स्थानिक फळे दिली जातील. हा उपक्रम 23 आठवडे सुरू राहणार आहे. अंड्यांचे सध्याचे बाजारभाव लक्षात घेऊन प्रति अंडयासाठी पाच रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.

शालेय शिक्षण विभागाने ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समित्यांमार्फत आणि शहरी भागात मध्यवर्ती स्वयंपाकघर प्रणालीद्वारे अन्न पुरवठा व स्वयंपाकाची व्यवस्था राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ दिला जातो. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना नियमित पोषणाबरोबरच अतिरिक्त पौष्टिक आहार देणे आवश्यक असून, विद्यार्थ्यांना अंड्यातील पोषणमूल्यांचा लाभ मिळावा, यासाठी शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.



हेही वाचा

मुंबईतील महत्त्वाचा मार्ग सात महिन्यांसाठी बंद

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा