Advertisement

माहिम चौपाटीचे सुशोभिकरण करणार - सुभाष देसाई


माहिम चौपाटीचे सुशोभिकरण करणार - सुभाष देसाई
SHARES

माहिम चौपाटी येथील परिसर केवळ स्वच्छ न करता या परिसराचे सुशोभिकरण करुन एक नवीन चौपाटी मुंबईकरांना मिळणार आहे, अशी माहिती मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

स्वच्छ भारत अभियान पंधरवड्यानिमित्ताने माहिम चौपाटी येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संपदा मेहता, नगरसेवक व इतर मान्यवर उपस्थित होते.



श्री. देसाई पुढे म्हणाले, माहिम किल्ल्याची डागडुजी, किनारा स्वच्छ करणे, तसेच स्थानिक रहिवाशांसाठी स्वच्छता गृहे बांधून देणे अशी कामे करण्यात येतील. यासंदर्भात पुढील कार्यवाही करण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.

सामान्य जनतेमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी, तसेच पर्यटनस्थळी स्वच्छता राखली जावी, यासाठी जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे ही मोहीम राबविण्यात येत आहे.


हेही वाचा

माहीम चौपाटी व्हावी 'स्पोर्टी'!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा