माहीम चौपाटी व्हावी 'स्पोर्टी'!

MAHIM
माहीम चौपाटी व्हावी 'स्पोर्टी'!
माहीम चौपाटी व्हावी 'स्पोर्टी'!
माहीम चौपाटी व्हावी 'स्पोर्टी'!
माहीम चौपाटी व्हावी 'स्पोर्टी'!
माहीम चौपाटी व्हावी 'स्पोर्टी'!
See all
मुंबई  -  

भरती आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईचा समुद्र ढवळून निघालाय. मुंबईकरांनी बिनदिक्कतपणे टाकलेली सगळी घाण हा समुद्र पुन्हा सढळ हस्ते देऊ करतोय. लाखो टन कचरा येऊन पडल्याने मुंबईतील सर्वच किनाऱ्यांची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. त्यात माहीम चौपाटीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.


चौपाटीच्या स्वच्छतेसाठी...

माहीमची चौपाटी हे मुंबईतील पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण. परंतु या चौपाटीवर पाऊल ठेवताक्षणीच पर्यटकांची निराशा होते, ती इथली अस्वच्छता पाहून. मात्र या चौपाटीला पुन्हा स्वच्छ आणि सुंदर रुप देण्यासाठी 'माहीम बीच कमिटी'चे सदस्य दिवस-रात्र झटत आहेत.

या सदस्यांच्या मेहनतीची दखल घेऊन परिसरातील नागरिक देखील त्यांना या उपक्रमात हातभार लावत आहेत. स्थानिक प्रशासनाने या कामाची दखल घेऊन माहीम चौपाटीवर स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटी सुरू करण्याची मागणीही या सदस्यांनी केली आहे.मुंबईचे वैभव

मुंबईचे वैभव म्हणजे इथले समुद्र किनारे. शहराला लागून 7 लहानमोठ्या चौपाट्या आहेत. या चौपाट्यांवर जाऊन पर्यटक जीवाची मुंबई करताना दिसतात. त्यातच शीतलादेवी मंदिर, मखदूम अली माहिमी दर्गा, सेंट मायकल चर्च अशी प्रसिद्ध धार्मिक स्थळे आणि माहीमचा किल्ला यामुळे पर्यटक मोठ्या उत्सुकतेने माहीमच्या चौपाटीवर फिरण्यासाठी येतात. परंतु चौपाटीवरील अस्वछता आणि गर्दुल्ल्यांचा वावर पाहून त्यांची पुरती निराशा हाेते.'बीच कमिटी'ची स्थापना

स्थानिक प्रशासन आणि सरकारकडे अनेकदा मागणी करूनही चौपाटीची स्वच्छता होत नसल्याने स्थानिकांनी पुढाकार घेऊन ऑक्टोबर 2015 मध्ये 'माहीम बीच कमिटी'ची स्थापना केली.

या कमिटीच्या सदस्यांनी चौपाटीवर स्वच्छता मोहीम हाती घेतल्यानंतर येथे बदल दिसायला लागला. महापाालिका प्रशासनालाही कर्तव्याची जाणीव झाल्यानंतर दर अोहोटीच्या वेळेस चौपाटीवर स्वच्छता होऊ लागली.

माहीम चौपाटीवर दर दिवसाला 40 ते 50 मॅट्रिक टन कचरा निकतो. ज्यात प्लास्टिकचे प्रमाण सर्वाधिक असते. हा सर्व कचरा मिठी नदीतून माहीम चौपाटीवर येतो. येथील कचरा साफ करण्यासाठी महापालिकेने एक खासगी कंत्रादार नेमला आहे, अशी माहिती 'माहीम बीच कमिटी'चे सदस्य अब्दुल सतार मोतीवाला यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिलीसमाजकंटकांचा त्रास

महापालिका परिसराची स्वच्छता तर करतेच; पण सामाजिक स्वच्छतेचा खूप मोठा प्रश्न माहीमकरांना पडला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दुल्ल्यांचा वावर आहे. ज्याचा रहिवाशांना प्रचंड तास होतो. लहान-मोठ्या चोऱ्या, मारहाण यांचाही रहिवाशांना प्रचंड त्रास होत आहे.

'माहीम बीच कमिटी'च्या मते गर्दुल्ले आणि चोरांना आळा घालण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलिस यंत्रणा चांगले काम करत आहेत. पण समाजकंटकांना आवर घालताना पोलिस बळ कमी पडत असल्याने येथे पोलिसांची संख्या वाढविण्याची मागणी 'माहीम मोहल्ला कमिटी'चे अध्यक्ष अन्वर खान यांनी केली.'माहीम बीच कमिटी'च्या मागण्या

  • चौपाटीवर स्पोर्ट्स अॅक्टिव्हीटी सुरू करा
  • पॅराग्लायडिंग, बोट स्पोर्ट्सचा समावेश करा
  • चौपाटीवर पर्यटकांची संख्या वाढवा
  • गर्दुल्ल्यांना आवर घाला
  • पोलिसांची कुमक वाढवा
  • चौपाटीवर दिवे, सीसीटीव्ही लावा
  • पोलिस, कोस्टगार्डकडून व्हावी देखरेखहेही वाचा

लवकरच माहीम चौपाटीवर सागरी पोलीस ठाणेडाऊनलोड करा Mumbai live APP  आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.