माहिम दर्गाजवळ शिवसेनेचा जल्लोष

 Mahim Dargah
माहिम दर्गाजवळ शिवसेनेचा जल्लोष
Mahim Dargah, Mumbai  -  

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारलीये. त्यानंतर गुरुवारी शिवसेना पक्षाच्या वतीने मुंबईतील प्रसिद्ध बाबा मकदूम माहिम दर्गाह येथे मराठमोळ्या पद्धतीने अनोखी सलामी देऊन विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. 

दर्गाह परिसरात ढोल ताशांचा गजर घुमला. घाटकोपर येथील गुरू माऊली ढोल पथकाच्या तरुण-तरुणींनी दर्गाह परिसरात ढोल वादन करून सलामी दिली. यानंतर महापौरपदी विराजमान झालेल्या विश्वनाथ महाडेश्वर यांच्या वतीने दर्गाहमध्ये चादर चढवण्यात आली. 

विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासोबत राज्यमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना उपनेते हाजी अराफात शेख, आमदार सदा सरवणकर, स्थानिक नगरसेवक मिलिंद वैद्य, नगरसेवक किरण लांडगे, विश्वस्त सोहेल खंडवाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

Loading Comments