Advertisement

कमला मिल आग: पब मालकाविरोधात गुन्हा दाखल


कमला मिल आग: पब मालकाविरोधात गुन्हा दाखल
SHARES

लोअर परळच्या कमला मिल कंपाऊंडमधील आगीप्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी मे. सी. ग्रेड हॉस्पीटॅलिटी इंटरटेन्मेट एलएसपी आणि इतर आस्थापनांचे संचालक तसेच व्यवस्थापकांवर गुन्हा नोंदवला आहे.


पब मालकाविरोधात गुन्हा दाखल

ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं समजत असून ज्या 'वन-अबव्ह' पब आणि 'हॉटेल मोजोस ब्रिस्टोल'ला ही भीषण आग लागली, त्या पब मालकांविरोधात पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवल्याचं समजत आहे. पोलिसांसोबत अग्निशमन दलानेही या घटनेची चौकशी सुरू केली आहे.

आग लागली तेव्हा या आस्थापनांकडून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही उपाययोजना करण्यात आली नव्हती. प्रवेशद्वाराजवळ अनेक अडचणी असल्यामुळे नागरिकांना बाहेर पडणं कठीण झालं होतं. या निष्काळजीप्रकरणी आस्थापनांचे संचालक आणि व्यवस्थापकांना दोषी धरण्यात आलं आहे.


१४ जणांचा मृत्यू

लोअर परळ इथल्या कमला मिल कंपाऊंडमधील ट्रेड हाऊस इमारतीला गुरुवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून त्यामध्ये ११ महिला आणि ३ पुरुषांचा समावेश आहे. तसंच या आगीत १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. तीन तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवलं असलं, तरी मिल कंपाऊंडमधील बँक कार्यालय, पब आणि हॉटेलचं मोठं नुकसान झालं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा