Advertisement

मानखुर्दमध्ये गोदामाला भीषण आग, परिसरात धुराचे लोट


मानखुर्दमध्ये गोदामाला भीषण आग, परिसरात धुराचे लोट
SHARES

मानखुर्दच्या मंडाळे परिसरात भीषण आग लागली आहे. स्क्रॅप गोडाऊनला आग लागल्याची माहिती मिळत आहे.

अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.  भंगाराची काही दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी गेेेेेेल्याचं कळत आहे. आगीमुळे मंडाळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.

आग वाढत चालली आहे. गेल्या ७ तासापासून आग धुमसतेय. आगीच्या आजूबाजूच्या परिसरात मोठी लोकवस्ती आहे. ही आग वाढू नये, यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीने प्रयत्न करत आहेत.

आगीची भीषणता लक्षात घेता अग्निशमन दलाच्या जवानांनी आजूबाजूचा परिसर खाली केला आहे. या परिसरात आजूबाजूला प्लॅस्टिकचेही गोदाम आहेत. आग वाढतच चालली आहे. त्यामुळे परिसरातील प्लॅस्टिकचे गोदामांनाही आग लागण्याची भीती प्रत्यक्षदर्शीनी वर्तवली आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार ही आग दुपारी दोन वाजेपासून लागली आहे. या भागात केमिकल जास्त आहे. त्यामुळे आग वाढली आहे. या गोडाऊनमध्ये केमिकल, लाकडं आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा