Advertisement

अंधेरीतील कंपनीत भीषण आग

अंधेरीतल्या एका कंपनीत भीषण आग लागली असून अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाला आहे.

अंधेरीतील कंपनीत भीषण आग
SHARES

अंधेरी पूर्वेतील रोल्टा कंपनीमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. अंधेरीतल्या २२ स्ट्रीट इथल्या एमआयडीसी इथं दुपारी १२.३४ वाजता ही आग लागली.

आग मोठी असल्याने परिसरात धुराचे लोट दिसत आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्ऩिशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे. यात आठ फायर इंजिन, सहा जंबो टँक घटनास्थळी दाखल आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सध्या तरी बोललं जात आहे. यावर अधिकृत माहिती मिळू शकली नाही. यासंदर्भात मुंबईकरांनी ट्विटरवर काही फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.

level 4 ची ही आग असल्याचं फायरब्रिगेडनं सांगितलंय. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु असून फायर ब्रिगेडच्या २० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. इमारतीतल्या सगळ्यांना सुरक्षीत बाहेर काढण्यात आलं असून मध्ये कोणी अडकून राहिलेलं नाही याचीही खात्री अधिकारी करत आहेत. आगीचा धूर सर्व इमारतीत पसरला असून जावांना आगीवर नियंत्रण मिळवताना अडचणींचा सामना करावा लागतोय.

हवेमुळे आग पुन्हा भडकली आणि पाहाता सर्व इमारतच आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आजुबाजूच्या इमारतीतल्या कर्मचाऱ्यांनाही बाहेर काढण्यात आलंय.

आग ही सर्व्हर रुमला लागली असल्यामुळे ती झपाट्याने पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जवान जास्त काळजी घेत आहेत. सर्व इमारतीत असलेले प्लायवूड आणि इलेक्ट्रॉनिक सामानामुळे ही आग भडकत आहे. काच आणि फायबरचा वापर करून इमारत बांधण्यात आल्याने आग पसरत आहे. फायर ब्रिगेडच्या आणखी गाड्या बोलावण्यात आल्या आहेत.

बुधवारी रात्री वांद्रे पूर्व इथं देखील आणखी एका आगीची नोंद झाली होती. यात सहा जण जखमी झाले. रुग्णांना उपचारासाठी सायन आणि भाभा रुग्णालयात नेण्यात आलं.हेही वाचा

कांदिवलीत सिलेंडरचा स्फोट, भीषण आगीत ९ जण होरपळले

शास्त्रीनगर नाल्यावरील २०२ अनधिकृत बांधकामं पालिकेने तोडली

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा