Advertisement

गोरेगाव फिल्मसिटी शेजारील आंबेवाडी परिसरातील घरांना भीषण आग

आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

गोरेगाव फिल्मसिटी शेजारील आंबेवाडी परिसरातील घरांना भीषण आग
SHARES

मुंबईच्या गोरेगाव फिल्मसिटी शेजारी नागरमोडी पाड्यात आंबेवाडी परिसरात भीषण आग लागली आहे.

संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास नागरमोडी पाड्यात असलेल्या आंबेवाडीचा झोपडपट्टीमध्ये ही मोठी आग लागली आहे.

आगीच्या माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 5 ते 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

घरात सिलेंडर गॅसचे विस्फोट होत असल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

सुदैवाने या आगीत जीवितहानी झालेली नसून मोठ्या प्रमाणात घरं जळून खाक झाली आहेत.

आग लागल्याची माहिती मिळताच नागरिक सावधगिरीने बाहेर पडले, त्यामुळं मोठा अनर्थ टळला आहे.



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा