Advertisement

पहिल्यांदाच सॅनिटायझर निर्मितीसाठी मोह फुलांचा वापर


पहिल्यांदाच सॅनिटायझर निर्मितीसाठी मोह फुलांचा वापर
SHARES
मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. सॅनिटायझरची मोठी मागणी आहे. हे लक्षात घेऊनच काही दुकानदार सॅनिटायझर चढ्या किंमतीे विकत आहे. तर हातावर पोट असलेल्यांना तर ते ही परवडत नाही. माञ आता काळजी करण्याचे कारण नाही. कारण सर्व सामान्यांना परवडेल याच किंमतीतले मोहलफुलांपासून बनवण्यात आलेले  सॅनिटायझर बाजारात विक्रीसाठी आलेले आहे. बाजारात सॅनिटायझरची किंमत 300 रुपये असताना मोहापासून तयार करण्यात आलेल्या सॅनिटायझरची किंमत केवळ 70 रुपये आहे. 200 मिली बाटली ही बाजारात 70 रुपयांना उपलब्ध होणार आहे.


मोह फुलांचा वापर फक्त दारू तयार करण्यासाठी केला जात होता  केली जाते असे आपण ऐकले आहे. कोरोनाविरुद्ध लढाईत सॅनिटायझरचा वापर महत्त्वाचा आहे. या सॅनिटायझरमध्ये 60 ते 70 टक्क्यांहून अधिक अल्कोहोल असते. आदिवासी पाड्यांवरील महिलांना दारूसाठी वापरण्यात येणार्‍या मोहफुलांपासून सॅनिटायझर तयार करण्यात आले आहे. बाजारात एकीकडे सॅनिटायझरचा तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतीमुळे लोकांना घेणे शक्य होत नाही. म्हणूनच  सर्व सामन्यांना ही कोविड पासून सुरक्षित ठेवण्यासाठी मोहापासून बनवण्यात आलेले सँनिटायझर सध्या बाजारत आणण्यात आले आहे.

कोविड-19च्या विरोधात प्रत्येकजण वेगवेगळ्या मार्गाने आपली लढाई लढत आहे. या युद्धात सॅनिटायझर हे महत्त्वाचे शस्त्र आहे. अलिराजपूर जिल्ह्यातील 10 आदिवासी महिलांच्या गटाने यूट्यूबवर सॅनिटायझर कसा तयार केला जातो हे पाहिले आणि त्यातून त्यांना कल्पना सूचली. ज्या फुलांपासून दारू तयार केली जाते त्यापासून सॅनिटायझर तयार करावा ही युक्ती सूचली आणि त्यांनी कल्पना प्रत्यक्षात साकार केली. मोहापासून सॅनिटायझर बनवून लोकांना स्वस्त दराने विकण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे आरोग्य विभागानेही तपासणी करून हा सॅनिटायझर उपयुक्त असल्याचे म्हटले आहे.

10 महिलांच्या गटाने मोहापासून सॅनिटायझर बनवून स्थानिक आरोग्य विभागाच्या डॉक्टरांकडून प्रथम त्याची चाचणी करण्यात आली. सर्व निकषांची पूर्तता करण्यास सक्षम असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर बाजारात आणण्यात आले. हे सॅनिटायझर 200 मिलीग्रॅम सॅनिटायझर मोहाचे सॅनिटायझर 70 रुपयांना विकले जात आहे. या उत्पादनाला वैद्यकीय मान्यता मिळाल्यानंतर बाजारात आणले आहे. हे सॅनिटायझर सेंद्रीय आहे यातून बरेच जंतू मरतात. यामध्ये तुरटी, कडुलिंबाची पाने, तुळशीची पाने आणि गुलाब जल वापरण्यात आले आहे. शाळा, बँका, सरकारी संस्थांमध्ये हे सॅनिटायझर देणार असल्याची माहिती या महिलांनी दिली आहे
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा