Advertisement

मालाड पश्चिमेकडील स्कायवॉकच्या पुनर्बांधणीचं काम दिवाळीनंतर


मालाड पश्चिमेकडील स्कायवॉकच्या पुनर्बांधणीचं काम दिवाळीनंतर
SHARES

मालाड पश्चिमेकडील स्कायवॉकच्या पुनर्बांधणीचं काम दिवाळीनंतर सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मालाड पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा राणी सती पादचारी पूल आणि मालाड रेल्वेच्या दक्षिणेकडील एलिव्हेटेड बुकिंग कार्यालयाला हा स्कायवॉक जोडला जाणार असून ज्याची पुनर्बांधणी दिवाळीनंतर केली जाणार आहे.


पूल 40 वर्ष जुना

मालाड पश्चिमेकडील हा स्कायवॉक 1978 मध्ये बांधण्यात आला होता. जो आता 40 वर्ष जुना झाला आहे. 2016 मध्ये याच्या पुनर्बांधणीचा निर्णय घेण्यात आला आहे. हा स्कायवॉक यावर्षी 7 आणि 8 जुलैच्या मध्यरात्री बंद करण्यात आला होता. ज्यानंतर या स्कायवॉकच्या पुनर्बांधणीसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. 

16 ऑगस्ट रोजी या स्कायवॉकच्या पुनर्बांधणीसाठी निविदा काढण्यात आली. या स्कायवॉकच्या पुनर्बांधणीसाठी 5 कोटी 45 लाख 13 हजारांचा खर्च असल्याची माहिती रेल्वेने पालिकेला दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा