Advertisement

राज्यात मलेरियाचे प्रमाण दुप्पट; रुग्णसंख्या १७,३६५ वर

राज्यात मलेरीयाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात २०२१-२२ या कालावधीत १७,३६५ नागरिकांना मलेरीयाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यात मलेरियाचे प्रमाण दुप्पट; रुग्णसंख्या १७,३६५ वर
SHARES

राज्यात मलेरीयाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात २०२१-२२ या कालावधीत १७,३६५ नागरिकांना मलेरीयाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. तसंच, हीच २०१९- २०मध्ये राज्यात मलेरियाच्या रुग्णांचे प्रमाण ९,४९१ होते. 

राज्यात कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव कमी असला तरी, अद्याप नागरिकांना कोरोनाचा धोका सतावत आहे. त्यामुळं अधीच कोरोना त्यात मलेरीया यामुळं नागरिकांना दुहेरी संकटाला तोंड द्यावं लागत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, मलेरिया (Malaria) मुक्तीत अडथळा आणण्यासाठी भौगोलिक रचनेसह स्थानिक घटक कारणीभूत आहेत. मुंबई पालिकेच्या माहितीनुसार, २०१०च्या मलेरिया प्रसारानंतर शहरातील प्रादुर्भावाच्या प्रमाणात कमालीची घट झाली आहे.

शहर उपनगरात वर्षाला पाच हजार रुग्णांची नोंद होते. मुंबई महापालिकेने डास निर्मूलन समिती स्थापन केली असून, त्यानुसार मलेरियावर नियंत्रण मिळण्यासाठी स्थानिकांकडून खबरदारी घेतली जाते का, याची पाहणी केली जाते.

दरम्यान, स्थानिक वातावरणातील घटक, पावसाळा, लोकसंख्येची घनता आणि अन्य कारणांमुळे हे प्रमाण वाढल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तर २०२१-२२ रुग्णांच्या ही संख्या १७,३६५ इतकी झाली आहे.

हेही वाचा - पाणी जपून वापरा! मुंबईच्या ‘या’ भागात ३० तास पाणीपुरवठा बंद

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा