Advertisement

पेन्शन योजनेसाठी 'त्याने' केला ७०० किमीचा सायकल प्रवास

‘रन फॉर पेन्शन’ची हाक देत प्रविण बहादे या कर्मचाऱ्यानं आंदोलनात सहभागी घेत थेट यवतमाळ ते ठाणे हे तब्बल ७०० किमीचे अंतर सायकरवरून पार करण्यास सुरूवात केली.

पेन्शन योजनेसाठी 'त्याने' केला ७०० किमीचा सायकल प्रवास
SHARES

नव्या पेन्शन योजनेला विरोध करत राज्य शासनातील कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. ‘रन फॉर पेन्शन’ची हाक देत या आंदोलनानं आता वणव्याचं रूप धारण केलं आहे. तसंच, कर्मचारी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलनामध्ये सामील होत आहेत. यातच प्रविण बहादे या कर्मचाऱ्यानं आंदोलनात सहभागी घेत थेट यवतमाळ ते ठाणे हे तब्बल ७०० किमीचे अंतर सायकरवरून पार करण्यास सुरूवात केली.


योजनेतील फसवेपणा

यवतमाळ जिल्हा परिषदेत लिपीक म्हणून कार्यरत असलेल्या प्रविण याला हिशोबावेळी या योजनेतील फसवेपणा दिसला. त्यावेळी या योजनेला विरोध करत त्याने योजना सोडत असल्याचा राजीनामाही दिला. परंतु, जुन्या पेन्शनसाठी संघटना निर्माण झाली असून या संघटनेनं मोर्चाची हाक दिल्याचे समजताच, प्रविण देखील आता या आंदोलनात सामील होण्यासाठी निघाला आहे.


कारवाईला न घाबरता

त्याचप्रमाणं, वरिष्ठांच्या कारवाईला न घाबरता प्रवीणनं १८ सप्टेंबर २०१८ रोजी यवतमाळहून जुन्या पेन्शन लढ्याची मशाल हाती घेतली. यवतमाळहून दारव्हा, कारंजा, मालेगाव, मेहकर, सिंदखेड राजा, जालना, औरंगाबाद, कोपरगाव, सिन्नर, इगतपुरी, शहापूर असा प्रवास करत प्रविण १ ऑक्टोबर २०१८ रोजी ठाणे येथून निघणाऱ्या पेन्शन दिंडीमध्ये सामील होणार आहे.


पेन्शन दिंडीत सामील होणार

प्रविणच्या या मशालीमुळे राज्यभरात वणवा पेटला असून आत्तापर्यंत ५० हजारांहून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांनी पेन्शन दिंडीत सामील होण्याचा निर्धार संघटनेकडे व्यक्त केला आहे. त्यामुळं लवकरच मुंबईवर लाखो शासकीय कर्मचारी पेन्शन दिंडी घेऊन धडकणार आहेत. तेव्हा या ‘वन मॅन आर्मी’च्या आंदोलनाची दखल सरकारला घ्यावी लागणार आहे. जुनी पेन्शन लागू होत नाही, तोपर्यंत हा वणवा संपणार नसल्याचं प्रवीणने माध्यमांशी बोलताना सांगितलं.



हेही वाचा-

पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे गजाअाड जातील - मुख्यमंत्री फडणवीस

विरोधकांच्या खोट्या आरोपांना आक्रमकपणे उत्तर द्या- नितीन गडकरी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा