कविवर्य मंगेश पाडगावकर चौकाचे नामकरण

 Pratiksha Nagar
कविवर्य मंगेश पाडगावकर चौकाचे नामकरण
कविवर्य मंगेश पाडगावकर चौकाचे नामकरण
See all

सायन - जे. आर. मेहता उद्यानाजवळील कविवर्य मंगेश पाडगावकर चौकाचे नामकरण बुधवारी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याहस्ते करण्यात आले. मंगेश पाडगावकरांच्या कविता आणि त्यांच्या स्मृती मनात अजरामर रहाव्यात यासाठी या चौकाचे नामकरण करण्यात आले. या नामकरण सोहळ्याला अजित पाडगावकर आणि त्यांचा परिवार देखील उपस्थित होता. यावेळी नगरसेविका राजेश्री शिरवाडकर यांच्यासह भाजपाचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.

Loading Comments