Advertisement

मनोज नरवणे होणार नवे लष्करप्रमुख, दुसऱ्यांदा मराठी व्यक्ती सर्वोच्चपदी

लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे हे मुळचे पुण्याचे आहेत. ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमार्फत (एनडीए) जून, १९८०मध्ये लष्करातील सातव्या शीख लाइट इन्फंण्ट्रीमध्ये अधिकारी म्हणून रुजू झाले.

मनोज नरवणे होणार नवे लष्करप्रमुख, दुसऱ्यांदा मराठी व्यक्ती सर्वोच्चपदी
SHARES

देशाच्या लष्करप्रमुखपदी आता मराठी माणसाची नियुक्ती होणार आहे. लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे हे देशाचे नवे लष्करप्रमुख असतील. सध्याचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत ३१ डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे  सध्या उपप्रमुख असलेल्या लेफ्टनंट जनरल नरवणे यांना लष्करप्रमुखपदी बढती दिली जाणार आहे.  याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. 

नवीन लष्करप्रमुख निवडताना सेवाज्येष्ठतेचाच विचार करण्याचा निर्णय केंद्र सरकार व संरक्षण मंत्रालयातील उच्चपदस्थ समितीने घेतला आहे. सध्या लष्करात बिपीन रावत यांच्यानंतर मनोज नरवणे ज्येष्ठ अधिकारी आहेत. त्यानंतर  सर्जिकल स्ट्राइकचे हिरो व सध्या उत्तर कमांडचे प्रमुख असलेले लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांचा क्रम लागतो. तिन्ही दलप्रमुखांच्या अलीकडच्या काही नियुक्त्या सेवाज्येष्ठतेनुसार झालेल्या नाहीत. त्यामुळे रणबीर सिंग यांचीही या पदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. २२ एप्रिल, १९६० रोजी जन्मलेल्या नरवणे यांचा लष्करप्रमुख म्हणून अडीच वर्षांचा कार्यकाळ असेल.

 लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे हे मुळचे पुण्याचे आहेत. ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमार्फत (एनडीए) जून, १९८०मध्ये लष्करातील सातव्या शीख लाइट इन्फंण्ट्रीमध्ये अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांनी चेन्नई विद्यापीठातून 'संरक्षण अभ्यास' या विषयात पदवी तसेच इंदूरच्या देवी अहल्या विद्यापीठातून 'संरक्षण व व्यवस्थापन' विषयात एमफिलचे शिक्षण घेतले आहे. लेफ्टनंट जनरल नरवणे यांच्याआधी १९८३ ते १९८६ या कालावधीत जनरल अरुणकुमार वैद्य या मराठी अधिकाऱ्यांनी लष्करप्रमुखाची धुरा सांभाळली आहे. 



हेही वाचा -

बोईसरमध्ये १२ बांगलादेशींना अटक

पश्चिम रेल्वेवरील 'या' स्थानकांना मिळणार नवा साज




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा